स्व सौ पद्मावती नारायणदास मुंदडा विद्यालयात शिक्षक दिन संपन्न

अमळनेर प्रतिनिधी,भारताचे माजी राष्ट्रपती,थोर शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन ‘उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी इ.१० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य करत स्वयंशासन दिन साजरा केला.

याप्रसंगी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन – माल्यार्पण करण्यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठशिक्षक श्री. गोकुळ पाटिल होते .यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक,

उपमुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका बजावली.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच श्री. गोकुळ पाटील सर यांचा वाढदिवस निमित्त शाळेच्या वतिने स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केलेल्या विद्यार्थ्यांनी आपणास वग अध्यापनाचा आलेला अनुभव -मनोगतातून व्यक्त केला.उपस्थित सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन कु.ऋतुजा पाटिल तर आभार प्रदर्शन वर्गशिक्षिका सौ. कीर्ती सोनार यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झालीं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!