अमळनेर,येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधी प्रा डॉ विजय गाढे यांच्या कार्याची दखल घेत दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमीने या वर्षांचा खान्देशातून “डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप -2024” पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
अखिल भारतीय साहित्य अकादमी,दिल्ली चे ४० वे राष्ट्रीय संमेलन दि. ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे पार पडले.यावेळी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एस.पी सुमनाक्षर, राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर, प्रोफेसर रतन लाल सोनागरा (अध्यक्ष स्वागत समिती), तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तथा माजी मंत्री संघप्रिय गौतमजी यासह अनेक आजी, माजी मंत्री उपस्थित होते.
प्रा डॉ विजय गाढे हे खान्देशात शिव- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अग्रणी भूमिका घेत असतात. प्रा डॉ विजय गाढे पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत. गाढेसंरा कडे विविध समस्येला वाचा फोडण्याची सुप्त कला आहे. त्यांना ग्रंथालय शास्त्र विषयात विद्यावाचस्पती ही पदवी मिळालेली आहे. गाढे सर उत्तम वाचक आहेत. अनेक पुस्तकांवर चर्चा करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. प्रा.डॉ विजय गाढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढलेली आहे. बहुजन समाजातील समस्याग्रस्त लोकांसाठी यापुढील जीवन व्यतीत करण्याचे त्यांनी ठरवले आहे. आपल्या धारदार लेखणीने बहुजनांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने चालू ठेवण्याचे त्यांनी सूचित केले. अगदी मनमिळावू स्वभाव असलेले प्राध्यापक गाढे यांनी समाजात निर्माण होत असलेली जातीयतेड याबद्दल खंत व्यक्त केली. आज भारतात जाती जातीत, धर्माधर्मात विषमता वाढत चाललेली आहे. त्यावर बाबासाहेबांच्या संविधानाचा योग्य वापर केल्याशिवाय ती समस्या मिटणार नाही असे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. समाजातील उच्च निचतेला फाटा देण्यासाठी समानतेचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात.बहुजन समाजाने एकत्रित येऊन अन्याया विरोधात लढा उभारला पाहिजे, या विचाराने समाजातील दुही संपविण्यास ते प्रयत्नशील आहेत.भ्रष्ट प्रशासन विरोधात आपल्या लेखणीतून ते अनेकदा आसूड ओढत असतात.या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उच्चकोटीचे कार्य करणाऱ्या अखिल भारतीय साहित्य अकादमी ने नई दिल्ली येथे दि ८ व ९ डिसेंबरला ४० व्या राष्ट्रीय संमेलनात खान्देशातून या वर्षांचा राष्ट्रीय पुरस्कार “डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार -२०२४” हा पुरस्कार प्रा डॉ विजय गाढे यांना देण्यात आला आहे.
त्यांनीं हा पुरस्कार आपली आई कालकथीत तुळसाबाई व वडील कालकथीत शालिग्राम गाढे यांना समर्पित केला.
*पुरस्काराचे स्वरूप :- गोल्ड मेडल,गौरवपत्र,मेमोन्टन.*
या संमेलनात देशातील प्रत्येक राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रा डॉ विजय गाढे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अभिनंदन दैनिक देशोन्नती चे जिल्हा संपादक मनोज बारी, उप संपादक सुनील भावसार,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री वसंत मुंडे,महासचिव डॉ विश्वास आरोटे,राज्यध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायासाकड,अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान मैराळे, साहित्य अकादमीचे जिल्हाउपाध्यक्ष चिंधु वानखेडे या सह समाजातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले असून त्यांच्या वर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.