अंमळनेर येथील सिंधी समाजातील थावराणी नामक कष्टकरी परिवारातील अनुराधा मुलीने मिळविलेल्या यशाचे कौतुक करावे तितके कमीच.
अनुराधाचा जन्म एका कष्टकरी थावरानी परिवार मध्ये झाला.तिचे वडील प्रताप थावराणी यांची कौटुंबिक परिस्थिती तशी हालाखीची आहे.शहरातील एका ठिकाणी मिस्कर सह प्रेशर कुकर दुरुस्तीचे त्यांचे दुकान आहे .त्यात मिळणाऱ्या कमाईतून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असतात.ते स्वतः उच्च शिक्षित असून सन 1991 ला B.COM.ही पदवी प्राप्त केली आहे.त्यांच्या मते मुलगा व मुलगी असा भेद नकरता मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे.त्यांनी स्वतः हा विचार आचरणात आणला आहे.त्यांना दोन मुली आहेत.कष्ट करून दोन मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त केले.त्यातील मोठी मुलगी ही BAMS करून MD करीत आहे.दुसरी कन्या कु.अनुराधा ही सुध्दा B. Com झाली आहे.
कू अनुराधा ही लहान पणापासून हुशार होती.वडिलांना ती त्यांच्या व्यवसायात हातभार लावत असते.तिने सुध्दा उच्च शिक्षण घेऊन वडिलांचे स्वप्नपूर्ती साठी मेहनत घेतली.वेळ मिळेल तसा ती अभ्यास करत असे.B.Com पदवी मिळविल्या नंतर तिने CA बनण्यासाठी तयारी ही सुरू केली.तसेच नुकतीच तिने मार्च महिन्यात महाराष्ट्र शासनाची MBA साठी MH CET ही परीक्षा दिली.त्यात तिला घवघवीत यश मिळाले.या परीक्षेत तिला जवळ जवळ 99.40% परसेंट मिळाले.ती महाराष्ट्रात 41व्या रँकवर होती तर कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत्रात 5 व्या रँक लां आली .यामुळे तिला राज्यातील नामांकित विद्यापीठ अर्थात पुणे विद्यापिठ (PUMBA) येथे MBA ला प्रवेश मिळाला आहे.याचे सर्व श्रेय ती आपल्या आई वडील यांना देते.तिच्या मते आई वडील यांनी आम्हां दोघी बहिणीनां शिक्षणासाठी प्रवृत्त केले नसते तर आम्ही उच्च शिक्षण घेऊ शकलो नसतो.ते सतत आम्हाला उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देत असतात आणि म्हणूनच मी चांगल्या मार्काने पास होऊ शकली.माझ्या यशाचे सर्वस्वी श्रेय आई वडील यांना ती देते.मुलींनी ही उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ व्हावे व आपल्या पालकां सह देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन तिने करडी नजर न्युजशी बोलताना केले आहे .
कुं अनुराधा MHCET परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास झाल्याने तिचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.