अमळनेर प्रतिनिधी. हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर यांच्या वतीने यावर्षीचा हिंदी भाषा जीवन गौरव पुरस्कार नंदादीप माध्यमिक विद्यालय निम येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ हिंदी अध्यापक अरुण प्रल्हाद चव्हाण यांना घोषित झालेला आहे.
१४ सप्टेंबर हिंदी दिवस निमित्त हिंदी दिवस सप्ताह निमित्त तालुका स्तरीय हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेत तालुक्यातून ग्रामीण व शहरी लहान – मोठा गटामधून 5700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात विशेष बाब म्हणून भडगाव तालुक्यातील सर्वोदय माध्यमिक विद्यालय, गुढे या विद्यालयाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामीण भागातून 32 शाळांनी तर शहरी भागातून 22 शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.या सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व हिंदी अध्यापक यांनी मोलाचे सहकार्य आणि जबाबदारी घेतली. यासाठी मंडळाच्या वतीने सर्व मुख्याध्यापक, हिंदी अध्यापक यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातून लहान – मोठा गट मिळून 36 विद्यार्थ्यांना लकी ड्रॉ पद्धतीने विजेता मधून निवडले गेले आहे.
*ग्रामीण क्षेत्र (लहान गट विजेता )*
प्रथम – ललित गोरख साळुंखे माध्यमिक विद्यालय, लोण ग्रुप
द्वितीय – हेमंत प्रदीपनाथ पाटील एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर, तृतीय – वर्षा हिरामण पाटील के पी सोनार माध्यमिक विद्यालय,जैतपीर,
उत्तेजनार्थ -4) रिया गुलाब पाटील बी वाय चौधरी हायस्कूल शिरसाळे, 5) हिमांशी किरण पाटील स्व.कमलअक्का पाटील सार्वजनिक विद्यालय,सारबेटा ग्रुप 6) हेमंत युवराज सैंदाणे सु.आ.पाटील विद्यालय,पिंपळे बु. 7) माहेश्वरी रवींद्र साळुंखे सु. हि.मुंदडे हायस्कूल,मारवड 8) हेतल राकेश पाटील, पं.नेहरू विद्यालय,फाफोरे 9) कल्पेश सुनील खैरनार आबासो एस एस पाटील विद्यालय, लोंढवे,10) तनिष योगेश गुरव शारदा माध्य. विद्यालय कळमसरे
*ग्रामीण विभाग(मोठा गट विजेता)*
प्रथम – सोनिया दिलीप पाटील किसान माध्य.विद्यालय, जानवे द्वितीय – देवयानी तुकाराम बाविस्कर, शां.र. देशपांडे विद्यालय, जळोद
तृतीय – उर्वी नरेश पवार बालाजी विद्यालय गांधली पिळोदे,
उत्तेजनार्थ -4) वैष्णवी भरत पाटील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव 5) भावेश योगेश महाजन आदर्श हायस्कूल मांडळ 6) नेहा दीपक पाटील अं.रा पाटील माध्य. विद्यालय मंगरूळ 7) वैष्णवी अनिल पाटील सर्वोदय माध्यमिक विद्यालय कावपिंप्री 8) मोहित मखराम राठोड मा. का. पाटील आश्रम शाळा रणाईचे 9) वैष्णवी मनोहर पाटील सरस्वती माध्यमिक विद्यालय पाडसे 10) दिशा रवींद्र बंजारा माध्यमिक विद्यालय रणाईचे.
*शहरी विभाग (लहान गट )*
प्रथम – विराज अविनाश पाटील एन टी मुंदडा विद्यालय अमळनेर द्वितीय – तेजश्री संतोष सुतार डी आर कन्या हायस्कूल अमळनेर तृतीय – आयुषी हेमंत भामरे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर उत्तेजनार्थ -4) भाग्यश्री प्रवीण पाटील पी बी ए इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर, 5) सोनल सुनील भोई एन टी मुंदडा विद्यामंदिर,माळीवाडा,अमळनेर 6) प्रणाली अनिल पाटील लोकमान्य विद्यालय अमळनेर 7) अवनी गणेश इंगळे के डी गायकवाड हायस्कूल, अमळनेर 8) अमयन असलमोद्दीन काझी अल -फैज उर्दू गर्ल्स स्कूल, अमळनेर
*शहरी विभाग (मोठा गट )*
प्रथम – निदा फिरदोस शेख जाकीर नॅशनल उर्दू हायस्कूल अमळनेर, द्वितीय – लावण्या पवन शिसोदे साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर तृतीय – मानसी हितेश पाटील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर, उत्तेजनार्थ -4) मृणाल लक्ष्मण पाटील सायरा देवी बोहरा सेंट्रल स्कूल अमळनेर 5) मनीष प्रकाश सोनवणे माध्यमिक विद्यालय अमळनेर 6) अजिंक्य किशोर साळुंखे सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर 7) यश राजकुमार पाटील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर,8) अर्चना रघुनाथ पाटील सावित्रीबाई फुले कन्या हायस्कूल अमळनेर
याव्यतिरिक्त विजेते सोडून विद्यालय स्तरावरील जे एक -एक उर्वरित विद्यार्थांना मंडळाच्या वतीने बक्षीस वितरणवेळी मेडल दिले जाणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाण पत्र दिले जाणार आहे.
हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर यांच्या वतीने यावर्षीचा हिंदी भाषा जीवन गौरव पुरस्कार नंदादीप माध्यमिक विद्यालय निम येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ हिंदी अध्यापक अरुण प्रल्हाद चव्हाण यांना घोषित झालेला आहे. या सहविचार सभेत मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.व तालुक्यातील 65 हिंदी अध्यापकांना कृतिशील हिंदी अध्यापक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे व बक्षिस वितरणाचा व जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर मार्गदर्शक सोपान भवरे, दीपक पवार जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी,तालुकाध्यक्ष आशिष शिंदे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्शुलकर,सचिव दिलीप पाटील,सहसचिव कमलाकर संदानशिव,कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील,प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन प्रतियोगिता पुरस्कार समिती मुनाफ तडवी, प्रदीप चौधरी सदस्य डॉ किरण निकम, श्रीमती प्रतिभा जाधव श्रीमती मंगला चव्हाण, श्रीमती कविता मनोरे ,श्रीमती योगश्री पाटील, प्रशांत वंजारी,श्रीमती प्रतिभा सावे, सुनील पाटील सर्व हिंदी अध्यापक बंधू, अमळनेर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.