अमळनेर प्रतिनिधी येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) याठिकाणी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तसेच प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले.यावेळी नाशिक येथील DATAMATICS GLOBAL SERVICE LTD या कंपनीद्वारे मुलाखती संपन्न झाले. त्यासाठी कंपनीचे अधिकारी श्री.कमलेश चिचे,श्री.कुणाल घोटेकर, श्री.तेजस गायकवाड, श्री.किशोर सोनवणे,श्री.केतन सोनार आणि श्री.दिनेश वाडिले हे मुलाखती घेण्यासाठी आले होते.
प्रस्तुत कॅम्पस मुलाखतीमध्ये बी.कॉम, एम.कॉम तसेच बीबीए अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
प्रताप महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून ह्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.
मुलाखती दरम्यान 63 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना महाविद्यालयाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झाला.सदर विद्यार्थ्यांचा सहा महिने परिविक्षाधीन कालावधी(Probation period) असेल त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार सेवेत कायम केले जाणार आहे.
खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, जेष्ठ संचालक श्री. हरी भिका वाणी, श्री.प्रदिपभाऊ अग्रवाल,श्री योगेशजी मुंदडे तसेच चिटणीस व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. वाणिज्य विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.योगेश व्ही.तोरवणे तसेच IQAC चे समन्वयक डॉ.मुकेश भोळे, प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे सदस्य प्रा.संदीप बी नेरकर मुलाखती घेतांना उपस्थित होते. वाणिज्य विभागातील डॉ.ज्ञानेश्वर मराठे, डॉ.किरण भागवत, डॉ.किरण सूर्यवंशी, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.अनिल झळके यांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रा.लुनकरण चोरडीया, प्रा.हर्षदा बाविस्कर, प्रा.कपिल मनोरे यांनी यावेळी समन्वयक म्हणून कार्य पार पाडले.