विशाल चौधरी याच्या वर दुसर्यांदा एमपीडीए अंतर्गत कारवाई….

 

अमळनेर : येथील विशाल दशरथ चौधरी याच्या दुसऱ्या वेळेस एमपीडीए कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.

विशाल चौधरी याच्यावर दहशत निर्माण करणे,दारू विक्री करणे ,जबरी चोरी,हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणे,हिंदू मुस्लिम दंगलीत सहभाग घेणे , जाळपोळ सह सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे,असे एकूण सात गुन्हे दाखल होते. त्याच्यावर पाच वेळा प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही म्हणून यापूर्वीही त्याच्या वर एकदा एमपीडीए कारवाई करण्यात आली होती.मात्र सध्या त्याची न्यायालयाच्या आदेशाने मुक्तता करण्यात आली होती. विशाल याने पुन्हा स्थानिक लोकांशी वाद घालून भोईवाड्यातील मंदिरातील वस्तू पेटवल्या म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा उपद्रव सामाजिक सलोखा राखण्यात अडथळा निर्माण होत असल्याने विशालला झामी चौक येथून हेड कॉन्स्टेबल सिद्धांत शिसोदे ,अमोल पाटील गणेश पाटील ,जितेंद्र निकुंभे , निलेश मोरे, चरणदास पाटील आदींनी मोठ्या शिताफीने अटक केली.

पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल चौधरी याच्या वर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यावर त्याला स्थानबद्ध करून कोल्हापूर येथील कारागृहात रवाना करण्याचे आदेश दिले.

पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, उज्वल म्हस्के ,मंगल भोई यांचे पथक त्याला कोल्हापूर कारागृहात नेण्यासाठी रवाना झाले आहे.

सदर कारवाई केल्याने पोलिस प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!