अमळनेर येथील शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ दुचाकीवरून आलेल्या चोरांनी हिसकावून केली पसार.
सविस्तर वृत्त असे की,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागातील गुरुकृपा कॉलनीत राहणाऱ्या रत्ना देसले या सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान रस्त्याने पायी जात असतांना एका दुचाकीवरून आलेल्या दोन तरुण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची माळ हिसकावून पसार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
अमळनेर ची झपाट्याने वाढती नागरी वस्ती सह लोकसंख्या पाहता अमळनेर पोलीस ठाण्यात पुरेसे पोलीस बळ नसल्याने वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अडचणी येत असल्याचे वृत्त वारंवार करडी नजर न्यूज ने प्रसिद्ध करून प्रशासनास निदर्शनास आणून दिले असूनही यावर वरिष्ठ अधिकारी पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिक करीत आहे.