अतिक्रमण काढल्याचा राग येऊन न पा कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण …… दाखल तक्रार मागे घेण्यास मुख्याधिकारीचा तगादा – राधेश्याम अग्रवाल

 

अमळनेर प्रतिनिधी,येथील शहरातील कोंबडी बाजार भागातील अतिक्रमण काढत असतांना अतिक्रमण धारकांचा न पा कर्मचाऱ्यांला झाली मारहाण.

सविस्तर माहिती अशी की दि.18.12.2024 रोजी दुपारी 12.00 वा.शहरातील,कोबडी बाजार भागात नवीन रस्त्याचे काम चालु असल्याने अतिक्रमण विभागातील न पा कर्मचारी राधेश्याम अग्रवाल त्याठिकाणी कर्तव्यावर असतांना दुपारी 12.30 वा. च्या सुमारास अतिक्रमण धारक जितेंद्र रजंन सांळुखे व त्याचा भाऊ दशरथ रजंन सांळुखे या दोघांनी आमची टपरी हि अतिक्रमण मध्ये आहे. ती रस्त्याच्या कामात निघुन जाणार आहे तुम्ही काही तरी करा,आमची टपरी तुटु देवु नका असे त्यांनी अग्रवाल यांना सांगितले मात्र अग्रवाल यांनी सांगितले की,ते माझ्या हातात नाही मला, मा.मुख्याधिकारी यानी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी काम करीत असतो,तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना भेटुन विनती करु शकतात, असे सांगितल्याचा दोघांना राग आल्याने दोघांनी अग्रवाल यांना लाथाबुक्कांनी, गालावर,पोटावर,पाठीवर मारहाण करून शिविगाळ केली आणि तु आमच्या टपरीला हात लावून दाखव तुला जिंवत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून जितेंद्र रजंन सांळुखे व दशरथ रजंन साळुखे विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोद करण्यात आला पुढील तपास पो.हे.कों नाना पवार करत आहे.

       दरम्यान सदर दाखल गुन्हा मागे घऊन काही तडजोड करा म्हणून मुख्याधिकारी यांनी माझ्या वर दबाव आणला असल्याचे न पा कर्मचारी राधेश्याम अग्रवाल यांनी भ्रमणध्वनी द्वारे करडी नजर न्यूज ला सांगितले.

     यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे.कर्मचाऱ्यांच्या बाजूला उभे राहण्या ऐवजी गुन्हेगारां पाठीशी घालणाऱ्या मुख्याधिकारी यांच्या वर कारवाई व्हावी म्हणून चर्चा होतांना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!