अमळनेरला एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा मृतदेह सापडला बोरी नदीच्या पात्रात……

अमळनेर प्रतिनीधी, येथील तालुक्यात एका तरुणाने झाडाला लटकून घेतला गळफास तर एका घटनेत डांगरी गावाजवळील बोरी नदीच्या पात्रात ४८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

सविस्तर वृत्त असे की खापरखेडा गावातील रहिवासी बापू दौलत भील यांचा मृत देह बोरी नदीच्या डांगरी गावा नजिकच्या खोऱ्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर ची घटना दि १४ रोजी ही उघडकीस आली.सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी पसरली होती. डॉ. आशिष पाटील यांनी जागीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी नाना पवार यांच्या खबरीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत तालुक्यातील शहापूर येथील १८ वर्षीय भोलेनाथ या तरुणाने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शहापूर येथील भोलेनाथ समाधान भील (वय १८) हा आईवडिलांसोबत राहत होता.तो रोज बकऱ्या चारण्याचे काम करीत होता. १५ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भोलेनाथ याने शहापूर शिवारातील नाल्याकाठी असलेल्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ देविदास ईशी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!