अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर विभाग द्वारे व राष्ट्रीय शिक्षा अभियान यांच्या सौजन्याने तीन दिवसीय राज्यस्तरीय मुलाखत कौशल्य कार्यशाळेचे उदघाटन १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात संपन्न झाले.
प्रस्तुत कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.सी.के.शर्मा (सीटीएमसी अकादमी,मुंबई) उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी,दानशूर प्रताप शेटजी,भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ जैन यांनी प्रा.सी के शर्मा यांचे पुष्प गुच्छ,सन्मान चिन्ह,प्रतापिय देऊन स्वागत केले.
या प्रसंगी व्यासपीठावर करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.तुषार रजाळे,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे,डॉ.हर्षवर्धन जाधव उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ.रवी बाळसकर यांनी करून दिले.प्रस्तुत कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन होते त्यांनी यावेळी महाविद्यालयाची शैक्षणीक वाटचाल विषद करून विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी सभागृहात डॉ.नलिनी पाटील,डॉ.बालाजी कांबळे,डॉ.सुनील राजपूत,डॉ.प्रदिप पवार,डॉ.राखी घरटे,प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.सचिन आवटे आदी उपस्थित होते.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे, दिलीप शिरसाठ,पराग पाटील,अतुल राजपूत,अमोल अहिरे, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रा.संदीप नेरकर,दिपक चौधरी आदींनी सहकार्य केले.
प्रस्तुत कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी सूत्र संचालन डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी मानले.
————————————————
*विद्यार्थ्यांनी चौकस व शिस्त पाळणे महत्वाचे*-
सी के शर्मा(मुंबई) यांचे प्रतिपादन
————————————————
मुलाखत संवाद कौशल्य हे विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्वाचे आहे, संवाद हे आत्मविश्वास,भाषा,ज्ञान,मूल्य यावर आधारीत असते.
मुलाखतीच्यावेळी कोणते गुण आत्मसात करावे ,बॉडी लँग्वेज कशी असावी,काय-कसे-कुठे-केव्हा बोलावे,पूर्व मुलाखत व मुलाखतीची तयारी कसे करावे याबाबत सुक्ष्मत्वाने पीपीटी द्वारे माहिती विषद केली.या वेळी विद्यार्थ्यांकडून काही प्रात्यक्षिक करून घेतले,कला,विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
दुस-या सत्राचे सूत्र संचालन प्रा.विजय साळुंखे यांनी केले.यावेळी डॉ.माधव भुसनर,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.अमित पाटील उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यशाळेच्या दोन्ही सत्रात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते