अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरातील धुळे रोड वरील चोपडाई येथे एसेसटी तपासणी पथकाने चोपडा येथील एका वाहनांची तपासणी केली असता त्यात १६ लाख ३८ हजार रूपयाची रोख रक्कम आढळून आली आहे.
पोलीस निरीक्षक विकास देवरे , सहाय्यक उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत , अमोल पाटील , जितेंद्र निकुंभे ,पथक प्रमुख आर. डी. सोनवणे , सचिन पाटील ,बुद्धभूषण जाधव यांनी वाहने अडवून तपासणी केली असता चोपडा येथील राज फायबर जिनिंगचे हितेश विनोदलाल लाड यांचे वाहन क्रमांक एम एच १९ जी एक्स ७५०० मध्ये १६ लाख ३८ हजार रुपये आढळून आले. गाडीवर जितेंद्र भोजु कोळी रा विरवाडे ता चोपडा हा चालक होता. ही रक्कम पियुष राजेंद्र जैस्वाल या व्यापाऱ्याची कापसाची रक्कम असल्याचे सांगण्यात आले. पथकाने ही रक्कम उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात पंचनामा करून जप्त केली. रक्कम दहा लाखाच्या वर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे असे समजते.