अमळनेर प्रतिनीधी,येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात ‘जागतिक विद्यार्थी दिन’ आणि “वाचन प्रेरणा दिन ” साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांनी ग्रंथालय-विभागातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला,यावेळी वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.वाचन- कौशल्य आणि जीवन या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक व सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.