अमळनेर प्रतिनीधी येथील नागरी हित दक्षता समिती च्या वतीने शेतकरी द्रोही युती सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी नागरी हित दक्षता समितीचे प्रा. अशोक पवार यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित करताना बोलले की, आमदार अनिल पाटील यांना लाडक्या बहिणीच्या मेळाव्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता आली असती तसेच मंत्री अनिल पाटील हे पाडळसरे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश नकरण्यात पूर्त अपयशी ठरले असल्याने यांचा जाहीर निषेध केला. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दहा वर्षात सूतगिरणी सुरू केली नाही पण ती विकून टाकली याबद्दल नापसंती व्यक्त करण्यात आली.निवडणुकीत उमेदवारी करू इच्छीनाऱ्या मालक प्रवृत्तीच्या दादांना पराभूत करण्यासाठी शाहू फुले आंबेडकर विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी व हे खोके सरकार पराभूत करावे असे आवाहन त्यांनी केली .
मेळाव्याला आघाडी मधील सर्वच नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.