अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने परभणी येथे संविधानाची झालेल्या विटंबनेचा केला निषेध.
सविस्तर वृत्त असे की, परभणी येथील सोपान दत्तात्रय पवार नामक व्यक्तीने दि 10 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृती ची तोडफोड करू विटंबना केल्याने त्याच्या निषेधार्थ देशातील भारतीय संविधान प्रेमीनी ठीक ठिकाणी संविधानिक पध्दतीने विरोध प्रदर्शन केली जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदे तर्फे दि 13 डिसेंबर रोजी प्रांतकार्यालया समोर जमून सदर घटनेचा निषेध व्यक्त करून सरकारला निवेदन देण्यात आले.
निवेदनात संविधानाची प्रतिकृती ची तोडफोड करणाऱ्या विकृत मनोवृत्ती च्या सोपान पवार व्यक्ती वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अश्या आशयाची मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी नगरसेवक नरेंद्र सदांनशीव,विनोद बिर्हाडे, सोमचंद सदांनशीव,चंद्रकांत सदांनशीव,बापूराव सदांनशीव,बाळासाहेब सदांनशीव,अर्जुन गडरे, रमेश झालटे,रवींद्र वाघ,समाधान मैराळे, प्रा डॉ विजय गाढे,ज्ञानेश्वर निकम,धीरज ब्रम्हे,श्रीकांत चिखलोदकर,सुरेश कांबळे, अरुण घोलप,प्रा डॉ भगवान भालेराव,विजय सदांनशीव,संजय सदांनशीव,झुलाल बिर्हाडे,गौतम सोनवणे,सुरेश वानखेडे, संजय बिर्हाडे या सह अनेक संविधान प्रेमी उपस्थित होते.