अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील भीम आर्मी ने परभणी येथील संविधान विटंबना करणाऱ्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणून भारताचे महामहिम राष्ट्रपती,भारत सरकार, दिल्ली यांना अमळनेर प्रांतधिकारी नितीन मुंडेवार यांच्या द्वारे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर भारतीय संविधानाची तोडफोड करून देशविरोधी कृत्य केलेल्या ने परभणी सह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या विरोधात पडसाद उमटले आहे.परभणी मध्ये संविधान प्रेमींनी एक दिवसाचा कडकडीत बंद पुकारला होता.दरम्यान किरकोळ दगड फेकीचे घटना घडल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व हे गैर कृत करणाऱ्या व्यक्तीवर देशदोहाचा गुन्हा दाखल करावा व परभणीत बंद च्या दरम्यान संविधान प्रेमी वर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावे अन्यथा भीम आर्मी च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व यास महाराष्ट्र सरकार संपूर्ण जबादार राहील याची नोंद घ्यावी ,या आशयाचे निवेदन आज दि १२ डिसेंबर रोजी प्रांतधिकारी नितीन मुंडेवार यांच्या द्वारे भारताचे राष्ट्रपती यांना देण्यात आले.
सदर निवेदनावर भीम आर्मीचे कृष्णकांत शिरसाठ,भुपेद्र शिरसाठ, कल्पेश बैसाणे,विशाल बिर्हाडे, गोलू सुतार,पंकज शिरसाठ,विवेक शिरसाठ,नितीन बिर्हाडे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.