नागरी हित दक्षता समितीचे ओला दु्काळ जाहीर करा या सह अन्य मागण्यासाठी धरणे आंदोलन संपन्न.,.

 

अमळनेर प्रतिनिधी येथील नागरी हित दक्षता समिती तर्फे ओला दुष्काळ सह अन्य मागण्या करीता तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

तात्काळ ओला दुष्काळ घोषीत करुन शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणे बाबत व इतर अन्य मागणी बाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनातं आघाडीतील सर्वच मान्यवर उपस्थित होते.

सदर धरणे आंदोलनाच्या माध्यमातून अमळनेर विधानसभा मतदारसंघात पावसाने थैमान घातले असुन सर्व महसूल मंडळात शेतात पानी साचल्याने पिकांची नासाडी होत आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन त्वरित पंचनामे करावे व अमळनेर विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा,सर्व विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश फी परत करावी व परीक्षा फी माफ करावी,पिक विम्याचे पैसे त्वरित द्यावे,पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित द्यावी,अमळनेर तालुक्यातील परिसरातील २०२१ ला नुकसान झालेल्या पिकांची थकीत नुकसान भरपाई त्वरित द्यावी,पाडळसरे धरणाचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करावा,पशुवैद्यकीय दवाखाना, पोलीस स्टेशन ,आरोग्य व्यवस्था , शिक्षण विभाग व अन्य शासकीय कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरावी व शासकीय नोकर भरती करावी,पोलीस पाटील , ग्रामपंचायत कर्मचारी, कंत्राटी व कायम कर्मचारी इत्यादी कर्मचार्यांचे वेतन व मानधन त्वरित द्यावे,महिलांच्या सुरक्षेत वाढ करावी,शेतमालाची शासकीय खरेदी झाली पाहिजे,पी.एम किसान योजनेचे पैसे त्वरित द्या, सर्व शासकीय कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी,आदी मागण्या करीता धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी श्याम पाटील,प्रा.अशोक पवार,ललिता पाटील,तिलोत्तमा पाटील,प्रा.सुभाष पाटील,डॉ.अनिल शिंदे,दयाराम पाटील,धनगर पाटील,भागवत गुरुजी,दयाराम पाटील,गोकुळ पाटील,श्रीकांत पाटील,मनोज पाटील,बी के सूर्यवंशी,अक्षय चव्हाण,दर्पण वाघ,अनिरुध्द शिसोदे,आरती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी उपस्थितानां खालील मान्यवरांनी संबोधित केले….

 

*मा.श्याम पाटील,शहर अध्यक्ष ,राष्ट्रवादी शरद पवार,* यांनी सांगितले की नागरी हित दक्षता समिती तर्फे शेतकरी,कष्टकरी,महिला,युवक व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे,तालुक्यात कोटी कोटी रुपये चे प्रवेश द्वार व सभागृह बांधण्या पेक्षा शेतकऱ्यांना मदत करायला हवे होते.मात्र लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

श्री.संजय पुणाजी पाटील – विद्यमान आमदार यांनी कोटी रुपयांच्या कामात २०% टक्के कमिशन घेतले , कोटी रुपयांची कामे मात्र शेतकऱ्यांना गावात चिखलातून जावे लागते,शेतकऱ्यांनी या विरोधात एकत्र यावे, ओला दुष्काळ जाहीर करा.

श्री.भागवत धनगर – लोकशाही वाचविण्यासाठी एकजूट व्हावे लागेल,ही भूमी शेतकऱ्यांची आहे, शेतकर्यांनी कायदे काळे हाणून पाडले,मात्र आज शेतकऱ्यांची *पेराल कपाशी तर घ्याल फाशी* अशी अवस्था झाली आहे.

डॉ अनिल शिंदे – तालुक्यात अनेक गावात रस्ते नाही,तापी काटच्या गावानां चांगले रस्ते नाही,कमानी चां पैसा शेत तळ्या साठी द्यायला पाहिजे होता,धरण पूर्ण होण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष लागेल,पीएमकेवायएस ची मान्यता शिवाय धरण पूर्ण होणार नाही,शहरात रस्ते नाही,विद्यमान आमदार यांनी ४०% टक्के द्या आणि कामे घ्या असे धोरण अवलंबिले आहे,हिवर तांडे येथे पाणी व रस्ते नाही,तालुका मध्ये आपत्ती निवारण केली नाही त्यांनी राज्यात काय मदत केले असेल ? आरोग्य योजनेचां खेळखंडोबा झाला आहे, शेतकरी आत्महत्या करीत आहे, शेतकऱ्यांना पेरण्या आधी दहा हजार रुपये द्या म्हणजे आत्महत्या होणार नाही.

तिलोत्तमा पाटील,राष्ट्रवादी ज्येष्ठ नेत्या.- “तुम लढो हम कपडे सभांलते हे” ही प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला होता,शेतकऱ्या साठी ५२ अध्यादेश काढून ही शेतकरी दुःखी,उद्योगपतींना करोडे रुपये माफ केले मात्र शेतकऱ्यांना वंचित ठेवले.यामुळे उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही,फुकट च्या योजना बंद करा,यामुळे शेत मजूर भेटणे मुश्किल झाले,सहकारी क्षेत्रातील काही लोक शेतकरी विरोधी आहेत,लवकरच जन समुदाय रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही,निवडणुका झाल्या नंतर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येतील,देश हुकूम शाही कडे वाटचाल करीत आहे,ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थ कोलमडली जाईल, विद्यमान आमदार यांनी आम सभा घेतली नाही.

विश्वास पाटील,गावरानी जागल्या – नकली बियाणे मुळे कपाशीच्या झाडाला फ्कत चार पाच कैऱ्याच येत आहे,यामुळे एकरी साडेतीन हजार झाडी मधून उत्पन्न किती येईल ? यामुळे शेतकरी पूर्ता खचला आहे.सरकारच्या शेतकरी धोरणाचा जाहीर निषेध केला पाहिजे.

प्रा सुभाष पाटील,राष्ट्रीय किसान काँग्रेस- तालुक्यातील मदत व पुनर्वसनमंत्री असताना तालुका ओला दुष्काळ करावा म्हणून आंदोलन करावे लागते, या नालायक सरकारला हाकलण्यासाठी रोज जवळच्या नातेवाईकांना फोन करा,२०२३ मध्ये ४० दिवस पाऊस पडला,दुष्काळाचा पैसा भेटला नाही,शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणाराच्या मागे उभे रहा,तरुणांच्या आत्महत्या मागे सरकारी धोरण आहे,३०% शेतकऱ्यांना पीक पेरा मिळाला नाही.

मा.मनोहर पाटील – अनिल पाटील यांना निवडून दिल्याने माझ्या सह सर्वांची झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी एकत्रित यावे लागले,अनिल पाटील यांना भूमिपुत्र म्हणजे शेतकरी पुत्र समजण्यात चूक झाली,तो चाटमाऱ्या निघाला, कमिशनच्या नादात नागरिकांना वाऱ्या वर सोडले,सर्व पदे याच्याच घरात,स्वतःचे मुल गाव हिंगोणाचा रस्ता अतिशय खराब आहे.

मा.अरुण देशमुख – शेतकऱ्यांवर सुलतानी संकट आले आहे. महिलांची सुरक्षा महत्वाची,महिलांनी जागृत व्हायला हवे,अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांचे पुनर्वसन नकरता बांधकाम व्यवसायिकांचे पुनर्वसन केले,सर्व पदे स्वताच्या घरात,तालुक्यातील एका गावाने आमदाराला मतदान नकेल्याने सदर गावात विकास कामे केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!