अमळनेर प्रतिनिधी,जळगाव जिल्ह्यातील 80% मंडळामध्ये जून, जुलै व आँगस्ट या महिन्यांमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त पावसाची नोद झाली. या झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आाहे. तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत पोहचवा,शासनाने घोषित केलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानातून इ-पीक पेरा नसलेल्या पण उताऱ्या वर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यानां पीक विमा मिळालेला आहे. तरी या शेतकर्यांचे कापूस व सोयाबीन अनुदान यादीत नाव आलेले नाही, लवकर याची नोंद घ्यावी व या शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच अमळनेर तालुक्यात ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली होती,नुकसानीचे पंचनामेही झाले.मागील तीन वर्षापासून शासन दरबारी निवेदने व आंदोलन करून देखील शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपार्ई ची रक्कम अजून मिळालेली नाही तरी याची लवकरात लवकर दखल घेऊन नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करावी, तालुक्यातील ५० पेक्षा जास्त शेतकर्यांची शेकड़ो हेक्टर जमीन TATA ESHA कंपनीच्या कापू बियाण्या अंतर्गत लागवड़ केलेली आहे. १२० दिवस झाले तरी पिकाला कोणतेही फळ नाही.तरी याची तात्काळ दखल घेऊन संबधित कंपनीवर कारवाई करून बाधित शेतकार्यांना नुकसान भरपाई द्यावी,रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये अनेक वेळा झालेल्या आवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी पीक विमा कंपनीच्या पोर्टल वर ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत तरी त्या शेतकऱ्यांना तात्काळ विम्याची रक्कम वर्ग करण्यात यावी,अश्या आशयाचे निवेदन अमळनेर तहसिलदार रुपेश कुमार सुराणा यांना देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष पाटील,संजय पाटील,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सचिन पाटील,राष्ट्रीय किसान मोर्चा चे हिरालाल पाटील,सुरेश पिरन पाटील,धनगरदला पाटील,त्र्यंबक पाटील,श्याम पाटील,विनोद बोरसे,योगेश शिसोदे,मनोज सनेर आदी उपस्थित होते.