अमळनेर प्रतिनिधी, येथील एस टी च्या चालक वाहक कर्मचारी यांनी २०१६ पासुनच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यासाठी सण उत्सवाच्या काळात उपसले संपाचे हत्यार.
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदत उलदून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यानां त्यांच्या हकाचे वेतन मिळत नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचार्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.सर्वच एसटी कर्मचारी चालक वाहक,कार्यशाळा कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने एसटी सेवा ठप्प झाली आली आहे.अमळनेर बस आगारात एकूण ६९ बस जागेवरच थांबल्याने दिवसाचे पाच ते सहा लाखाचे नुकसान महामंडळाला सोसावे लागले.जवळपास साडे पाचशे फेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थी सह महिला, आबालवृद्धांचे हाल झाले.
*अनेकांनी केला आपला प्रवास रद्द*
ऐन सण उत्सव तोंडावर असल्याने अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले.त्यात मात्र आज एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाची अनेकाना माहीतीच नसल्याने अनेकजण बसस्थानकावर आले. मात्र बसेस रद्द झाल्याने अनेक प्रवाशांनी पुन्हा घरची वाट धरली.बाहेरचा प्रवास टाळला.मिळेल त्या वाहनांनी प्रवास करताना पाहायला मिळाले.एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे एसटी बस सेवेवर त्याचा परिणाम झाला.असंख्य प्रवाश्यांना यामुळे ताटकळट रहावे लागले.एसटी बसेस सुरू न झाल्याने असंख्य लोकांना इतर वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला.अनेकांनी रेल्वे स्थानक गाठले.मिळेलत्या डब्यात जागा शोधत जनरल तिकीट काढून प्रवास करण्यावर भर दिला. तर अनेकांनी खासगी वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला. त्यामुळे खासगी वाहनांवर देखील भार वाढला,तर काहींनी दुपारनंतर तरी बस सेवा सूरू होतील या आशेने बसस्थानकावर बसून वाट पाहण्यावर भर दिला. सकाळपासून अनेक प्रवाशी बसस्थानकावर बसची वाट पाहत बसून होते.
*काय आहेत मागण्या ???*
राज्य परिवहन कर्मचार्यानां राज्य शासकीय कर्मचारी प्रमाणे वेतन मिळाले पाहिजे, महागाई भत्ता,घरभाडे भत्ता, वेतनवाढीच्या दरातील थकबाकी, मूळ वेतनात सरसकट पाच हजार द्यावे,४ हजार ८४९ कोटीतील उर्वरित रक्कम त्वरित अदा करा.