अमळनेर प्रांत व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आक्रोष मोर्चा धडकला…

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील बाल विकास प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या बालविकास प्रकल्पाधिकारी श्रीमती प्रेमलता पाटील व उपविभाग प्रांत कार्यालयाचे जोशी साहेब नायब तहसीलदार यांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोर्चाने जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यांत आले त्यांनी तुमच्या मागण्या रास्त असून त्या शासनास पाठवितो असे सांगीतले. मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्विकारले .

मागण्या खालील प्रमाणे…..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल 2022 पासून सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ग्रॅज्युटी लागू करा आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन चा जीआर ताबडतोब काढा , तसेच अंगणवाडी कर्मचारी हे अत्यल्प मानधनात काम करीत असून त्यांना त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी,आदी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून आपला संतप्त भावना व्यक्त केल्या .

मागण्यांचे निवेदन देतानां तालुकाध्यक्षा सौ विद्याताई पाटील,उपाध्यक्षा भिकुताई पाटील व सर्व सेविका मदतनीस तसेच भानुदास पाटील संघटक सचिव यांनी निवेदन दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!