अमळनेर येथील सर्व समाज बांधवांनी परभणी मध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्याच्या प्रयत्न करण्याऱ्या दोषींवर कारवाई करावी आणि पोलिस प्रशासना कडून राबविण्यात येणारे कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की ,परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर एका संविधान विरोधी व्यक्तीने संविधान फाडत विटंबना केल्याच्या विरोधात आज अमळनेर शहरात सर्व समाज बांधवाच्या वतीने प्रांताधिकार्यना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हंटले आहे की, दि.१०/१२/२०२४ रोजी परभणी येथे समस्त भारतीय नागरिकांची तसेच संविधान प्रेमीचीही अस्मिता असलेल्या भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाचा अवमान करणाऱ्या अतिशय घाणेरड्या मनोविकृतीच्या मानसिकतेचा आम्ही समस्त अमळनेरचे दक्ष व जागरूक नागरिक अत्यंत तीव्र निषेध करतो व दोषीवर कठोर कारवाई करून देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, या आशयाची मागणी निवेदना द्वारे केली आहे.
या प्रसंगी विशाल सोनवणे, गौतम बि-हाडे, बाळासाहेब संदानशिव, अर्जुन संदानशिव, राहुल बि-हाडे,मनोज शिंगाने, गौरव सोनवणे,नावीद शेख, गुलाम नबी,रिजवान शेख,मौलाना रियाज, पंकज चौधरी, समाधान बि-हाडे, सोनू बि-हाडे,दर्शन बि-हाडे, अक्षय सोनवणे, अजय बि-हाडे,सागर पाटील,अनिकेत बि-हाडे,ओम बि-हाडे, भूपेंद्र शिरसाठ,पवन बि-हाडे यांचा सह नागरिक उपस्थित होते.