अमळनेर येथील शहरातील दर्गा अली मोहल्ला मध्ये दूषित पाणी नळ द्वारे येत असल्याने नवीन पाईप लाईन टाकून मिळण्याबाबत नागरिकांनी दिले निवेदन.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील दर्गाअली येथील मस्जिद च्या मागील भागातील गल्लीत अनेक दिवसांपासून नगर परिषदेच्या नळा द्वारे दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच लहान मुलांचा आरोग्यच्या प्रशन निर्माण होत आहे. या करीत या भागातील जुनी ३ इंची पाईप लाईन काढून ४ इंची नवीन पाईप लाइन टाकून परीसरातील सामान्य जनतेच्या व लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा,या साठी पाणी पुराठा अधिकारी प्रवीणकुमार बैसाने यांना सुन्नी दारुल कज़ा व अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरी तर्फे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष रियाज़ शेख,माजी नगर सेवक फिरोज मिस्री, अज़ीम शोला, लतीफ पठान, जावेद शेख आदि मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आले.