अमळनेर प्रतिनिधी येथील सपोनि जिभाऊ तुकाराम पाटिल यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार लोण गावाच्या शिवारात गावठान भागातील धरणाजवळ मिनाबाई मगन भिल वय-46 या गावठी हात भट्टी ची दारु पाड़त असल्याचे समजल्याने पोलिस कर्मचारी सहा. फो. फिरोज जैन्नोहिन बागवान, चालक पोहेकॉं. संजय दगडु पार्टील, पोहेकां. प्रविण देविदास पाटील आदींना असे लोण शिवारात रेड कामी लागणारे सिल साहीत्य सोबत घेवून वरील पोलिस स्टाफ असे सरकारी वाहनाने मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी पाठवले.
सदर पथकाने लांब रस्त्यावर थोडया अंतरावर वाहन उभे करुन लांबून बातमीची खात्री केली असता सदर ठिकाणी गावठान भागातील धरणाजवळ एक महिला दारु गाळतांना दिसली त्या वरुन वरील सर्व लोकांची खात्री झाल्याने छापा टाकुन मीना भिल हिस जागीच पकड़ले .त्याठिकाणी खालीलप्रमाणे माल मिळुन आला ,
1) 8750/- रुपये किंमतीचे दहा 30 लिटर मापाचे प्लॅस्टिकचे ड्रम त्यात सुमारे 250 लिटर गुळ,नवसागर मिश्रीत रसायन कि.अ.(प्रति 35 रुपये लिटर प्रमाणे)
2) 00.00 रु कि.चे एक जिवंत हात भट्टी त्यात एक पत्री ड्रम व गाळणी,एक प्लॅस्टीक पाईप, तगारी,जळतण वैगेरे साहीत्य असे एकुण- 8750/- रु किं.अं ताब्यात घेण्यात आला. सदर आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम कलम 65(फ) (ब)(क)प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास महिला पोहेकॉ रेखा इशी या करीत आहे.