अमळनेर,येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान नमिळाल्याने महायुतीचा व शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्री मंडळात स्थान नदिल्याने राज्यात ओबीसी नेते म्हणून ओळख असल्याने ओबीसीं बांधवां कडून महायुतीच्या विरोधात ठीक ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.मा छगन भुजबळ यांना महायुतीत सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली नाही.
महायुतीच्या मोठ्या विजयामध्ये ओबीसीं समाजाचे योगदान मिळविण्यात छगन भुजबळ यांचा मोलाचा वाटा असतांना मंत्रिमंडळात स्थान नदिल्याने अमळनेर मधिल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाजा तर्फे महायुतीच्या विरोधात घोषणाबाजी देऊन निषेथ व्यक्त करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन, समता परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक दिनेश माळी, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन उपाध्यक्ष रमेश महाजन, माजी नगरसेवक देविदास भगवान, अर्बन बँकेचे संचालक लक्ष्मण पांडरंग महाजन, तुळशीराम तुकाराम महाजन, ईश्वर महाजन सर, श्रावण महाजन, पंडित महाजन, संजय महाजन, गणेश महाजन, बाबूलाल पाटील, कैलास महाजन,गणेश महाजन,जयंत महाजन ,ईश्वर चौधरी, प्रवीण महाजन यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.