अमळनेर प्रतिनिधी,येथील युवा ईंजिनियर व सामाजिक कार्यकर्ते परेश यशवंतराव शिंदे यांनी नूकताच शरदचंद्र पवार यांचा आशीर्वाद घेवून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेतली असून त्यांना राष्ट्रवादी अमळनेर युवक तालुका अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांची निवडीबद्दल अमळनेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, सौ सरचिटणीस . तिलोत्तमा रविंद्र पाटील,प्रा. अशोक पवार, संभाजी बिगेडचे श्याम पवार, ग्रंथसेल प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, रीताताई भुपेंद्र बाविस्कर,अनंत निकम, गोर्वधनचे माजी सरपंच श्यामकांत पाटील,डॉ. प्रशांत शिंदे,प्रविण देशमुख, ईंजिनियर शुभम सोनवणे,दिनेश वाहेगवकर,नरेंद्र पाटील,दिनेश साळुंखे, योगेश पाटील,सागर पाटील, मयूर पाटील, यांच्या सह अनेकांनी अभिनंदन. केले आहे.