कार्यकर्त्यांची मेहनत आणि तळमळ काय असते ते मी स्वतः अनुभवले… राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

 

अमळनेर प्रतिनिधि येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थित पार पडला.

मेळाव्यात उपस्थिती कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की,माझा दोन वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे सर्वच बाजूने अत्यंत वाईट परिस्थिती झाली असताना इतरांप्रमाणे घरांला कुलूप लावून कधी पळालो नाही आणि मागची विधानसभा निवडणूक केवळ तुमच्याच बळावर मी जिंकलो,35 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकिर्दीला तुम्हीच खरे बळ आणि ऊर्जा दिली आहे.मी आलो आणि थेट आमदार झालो असे मुळीच नसून राजकीय वर्तुळात चळवळीतून आलेला मी कार्यकर्ता आहे.संकटे आली तरी कुलूप लावून पळून न जाता,सुख व दुःख असेल किंवा विविध सण व उत्सव असतील तुमच्यासोबत कायम उभाच राहिलो,कारण कार्यकर्त्यांची मेहनत आणि तळमळ काय असते ते मी स्वतः अनुभवले आहे.मागच्या निवडणुकीत मी खचलेलो असताना तुम्ही मेहनत घेतली नसती तरी मी आमदारही झालो नसतो आणि या भूमीला मंत्रीपद ही कधी मिळाले नसते,त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासाठी देवदूर्लभ असून कार्यकर्ते हेच माझे कुटुंब आहे.आयुष्यात अनेक संकटे आली तरी याच कार्यकर्त्यांनी मला सावरले आहे.निवडून आल्यानंतर या भूमी साठी काहितरी चांगले करण्याचाच प्रयत्न मी केला असून कोणाचा काहीही उद्देश असो आपल्या सर्वांचा उद्देश मातृभूमीची सेवा आणि विकास हाच आहे.आणि आपल्या कार्यावर जनता नक्कीच समाधानी आहे.बदल दिसतोय असा सूर प्रत्येकाच्या मुखात आहे.यापुढेही सेवेचा हा वारसा आपल्याला पुढे कायम ठेवायचा असल्याने विरोधकांच्या टीकाटीपणी वर लक्ष न देता जोमाने कामाला लागावे ,आपला हेतूच स्वच्छ असल्याने आपल्या सर्वांच्या ताकदीने आपण निश्चित पणें ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकू च असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरातील अंबिका मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्यात शहर व ग्रामीण भागातून प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार,जिल्हा प्रवक्ते श्री देसले,माजी नगराध्यक्ष सौ जयश्री पाटील,मार्केट सभापती अशोक पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक व मान्यवर उपस्थित होते.सुरवातीला प्रास्तविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले.सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.

यावेळी अमळनेर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी,माजी जीप व पस सदस्य,सर्व फ्रन्टलचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, बुथ कमेटी प्रमुख,माजी नगरसेवक आदी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!