श्याम पाटील यांनाच उमेदवारी द्यावी- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस 

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्याम पाटील यांना उमेदवारी द्यावी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने मां शरद पवार यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

सदर च्या पत्रात पुढील प्रमाणे मागणी केली की,मध्यंतरीच्या काळात पक्षाला अडचणीत लोटून जवळचे काही ज्येष्ठ – कनिष्ठ सहकारी देखील सोडून गेले. मात्र साताऱ्या च्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतलेल्या महाराष्ट्रातील मुत्सद्दी चाणक्य ज्यांचे आदर्श असतील, ते अश्या लहानसहान क्षतिंनी खचून जात नाहीत,हे बाळकडू आम्ही आपणां कडूनच शिकलो आहोत.

सदर पत्राचे प्रायोजन असे की, श्री.श्याम जयवंतराव पाटील, शहरध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-(शरदचंद्र पवार),हे अमळनेर मतदार संघातून विधानसभे साठीचे नव उमेदीचे तरूण तडफदार नेतृत्व असणारे इच्छुक उमेदवार आहेत.अगदी सुरूवाती पासूनच श्याम भाऊ हे समाजकारणात अग्रणी राहिले आहेत व त्याअनुषंगाने जनतेच्या सेवे खातर राजकारणात सक्रिय आहेत.

आपल्या फुले-शाहू- आंबेड़कर विचारांशी एकनिष्ट असणारे आमचे श्याम भाऊ,हे पक्षाी नेहमी एकनिष्ठ राहिले आहेत हे काही वेगळे सांगण्याची गरज वाटत नाही.मध्यंतरी काळात पक्ष फोड़ाफोड़ीच्या राजकारणांत,जेव्हा अनेक मुत्सद्धी है पक्ष सोडून जात होते तेव्हा, अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी ठामपणे एकनिष्ठ राहून संपूर्ण तालुक्यात व अमळनेर शहरात पक्ष वाढवण्याचे शिवधनुष्य श्याम भाऊंनी लीलया पेलले. संपुर्ण अमळनेर मतदार संघात त्यांनी पक्षाचे संघटन मजबूत केले आणि पक्षाचा विस्तार संपूर्ण तालुक्यात वाढवण्याचे काम श्याम भाऊंनी केलेले आहे. शेतकरी, कामकरी, वंचित घटकांचे प्रश्न सोड़वण्याचे व विद्यार्थी कॉँग्रेसच्या माध्यमातून युवा नेतृत्वाला घड़वण्याचे श्याम भाऊ करीत आहेत.पक्षातील स्वपदाधिकारी यांना सोबत घेऊन पक्षाचा व्याप संपूर्ण तालुक्यात वाढवत, त्यांनी मागील काही महिन्यापासून बळीराजा शिवार फेरी सारखे विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले आहेत, पक्षा सोबत प्रामाणिक राहिलेल्या मा.श्री.श्याम जयवंतराव् पाटील यांना येणाया विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षा तर्फे अमळनेर मतदारसंघात उमेदवारी द्यावी ही, संपूर्ण अमळनेर शहरातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष- (शरदचंद्र पवार )च्या पदाधिकायांच्या व सामान्य जनतेच्या वतीने आपणांस सविनय विनम्र विनंती., अश्या आशयाचे पत्र देण्यात आले.

या पत्रावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल बिऱ्हाडे,प्रशांत बोरसे,समीर शेख,उज्वल पाटील,आकाश साळवे,राज संदानशिव, करन मोरे,सुबोध बिऱ्हाडे यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!