अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज कार्यकर्त्या सह मतदाराच्या उपस्थितीत भरला.
अमळनेर नगरीचे आराध्य दैवत संत सखाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅली काढत शहरातील प्रमुख मार्गावरून रॅलीचा समारोप प्रांतकार्यालया समोर समारोप केला.याप्रसंगी शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचे गुलाब पाटील,उद्योजक तथा राजकीय मास्टर माईंड प्रा डॉ रवींद्र चौधरी व स्वतः शिरीष चौधरी यांनी उपस्थित समूहाला मतदान करून विजयी करण्यास भावनिक साद घातली.
याप्रसंगी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.रॅलीत उपस्थित डीजेच्या तालावर थिरकत कार्यकर्ते टायगर अभी जिंदा है च्या घोषणा देत होते.रॅली मध्ये गाडी वर उभे राहून शिरीष चौधरी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नागरिकांना हात जोडून अभिवादन करत होते.रॅली संपवून शिरीष चौधरी यांनी सोबत चार मान्यवर व्यक्तीनां सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडेवार यांना सादर केला.