अबब….केंद्र सरकारचा प्रचार शासनाच्या तिजोरीतुन ?

अमळनेर प्रतिनिधी,सरकारी यंत्रणेचा वापर सरकारचा प्रचार करण्यासाठी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष श्याम पाटील यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भारतात अनेक पंतप्रधान झालेत प्रत्येकाने विविध योजनांची सुरुवात केली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे नवखे पंतप्रधान असतांना देखील त्यांनी विविध कामांचा शुभारंभ केला. पंचवार्षिक योजना त्यांचीच फलश्रृती आहे. देशाला आधुनिकतेकडे नेण्याचे त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी नविन तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेतले. देशाच्या एकतेवर भर दिला. इंदिरा गांधी यांनी देखील कणखर नेतृत्व करित देशाला प्रगती पथावर नेले. राजीव गांधी यांनी संगणकाचा पाया रोवला. अटलबिहारी यांच्या काळात अणुचाचणी होऊन अण्वस्त्र बाबतीत देश सबळ झाला. प्रत्येकाने आपले योगदान दिले आहे. मनमोहनसिंग यांनी जागतिक मंदीच्या काळात भारताला सावरले. ह्या सर्व पंतप्रधानांनी शासकिय योजनांचा प्रचार करतांना कधी स्वःताचा प्रचार करुन नाही घेतला.

आता मात्र भारत सरकार ऐवजी सरकारची ओळख मोदी सरकार म्हणून करण्यात येते. कुठेतरी संविधानाची गरिमा पुसली जात आहे. सरकारी यंत्रणेचा वापर सरकारचा प्रचार करण्यासाठी होत आहे. आता नुकताच जळगावला पंतप्रधान येत आहेत त्यासाठी जिल्हयातून 2129 बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. 25 ऑगस्ट 2024 चा कार्यक्रम हा सरकारी बसेस वापरुन होणार आहे. आता पर्यंत कुण्याही पंतप्रधानांनी असा सत्तेचा गैरवापर केलेला नाही. लोकांचा जमाव होण्यासाठी हा देखावा दिसून येतो. तुमच्या वैयक्तिक खर्चातून हा खर्च केला असता तर काही बिघडले नसते. परंतू यात ग्रामसेवक, शिक्षक आशा वर्कर्स, महिला बचतगट, गट समन्वयक,पंचायत समिती कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी अशा लोकांना सक्ती करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी 4 दिवसापासून शासकिय कामे खोळंबली आहेत. ग्रामीण वाहतुकिवर याचा फार परिणाम होणार आहे. पंतप्रधान ह्या देशाच्या जबाबदार व्यक्तिने असे करणे योग्य नाही. याचा अर्थ सभेला गर्दी होण्यासाठी हा फंडा असल्याचे लोकांमध्ये चर्चा आहे.

याबाबत श्याम पाटील शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी तीव्र शब्दात या सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याबद्दल निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!