अमळनेर प्रतिनिधी,महाराष्ट्रात सतत होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. वर्षभरात एक दिवस असा गेला नाही की त्यात महिलेवर, बालीकेवर, तरुणीवर अत्याचार झाला नाही. काही घटनांमध्ये पीडित महिलेला जीवे मारुन टाकण्याचे प्रकार घडले आहे. डाॅक्टर तरुणीवर अत्याचार नुकताच घडला असतांना बदलापूर येथील आदर्श विदयालयात 2 बालिकांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. नाजूक मने, कोमल शरीर अजून जीवनाच्या उमलत्या वाटेवरील बालिकांवर अक्षय शिंदे नामक नराधमाने अत्याचार केले. अशा 22 हजार केसेस झाल्यात परंतु सरकार त्याबाबत सुस्त असल्याने तसेच प्रशासन ढिल्ले असल्याने तात्काळ कारवाई होत नाही. याबाबत जागरुक महाविकास आघाडी अमळनेर च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यास झालेल्या अत्याचाराच्या घटनेला योग्य न्याय मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार बी. एस. पाटील, तिलोत्तमा पाटील, संदीप घोरपडे, बी. एस. सुर्यवंशी, गोकुळ बोरसे, संजय पाटील ,गजेंद्र साळुंखे, के. डी. पाटील, मनोज पाटील, सचिन पाटील, प्रशांत निकम, बन्सीलाल भागवत, तुषार संदानशिव उपस्थित होते.