अमळनेर प्रतिनिधी,शहरातील एम आय एम च्या वतीने अमळनेर पोलिस ठाण्यात रामगिरी महाराज यांच्या प्रवचनामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर संदर्भात बदनामी वादक व चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविल्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी अमळनेर एम आय एम च्या मार्फत पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे
रामगिरी महाराज सारला ता. श्रीराम जि. अहमदनगर यांनी जाणीवपूर्वक पैगम्बर मोहम्मद (सं) यांच्या बद्दल समाजात खोटी माहिती सांगून समाजात तेड निर्माण केला मुस्लिम समुदायाबद्दल इतर समाजाच्या मनामध्ये द्वेष निर्माण व्हावा या उद्देशाने रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद (सं) व मुस्लिम समुदायाची बदनामी करणारे वक्तव्य जाणीव पूर्वक केलेले आहे.करीता प्रेषितांची व मुस्लिम समुदायाची बदनामी केल्या प्रकरणी रामगिरी महाराज सारला ता. श्रीराम जि. अहमदनगर त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करावे अशा मागणीचे निवेदन एम आय एम व मुस्लिम बांधवानी पोलिसांना दिले आहे
या वेळी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी आश्वासन दिले की दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करू या प्रसंगी एम आय एम अमळनेरचे शहर अध्यक्ष हाजी सईद शेख, मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया, हाफिज तौसिफ रजा,एम आय एम चे युवा नेते अल्तमश शेख, गुलाम शेख, दानिश शेख,शहिद शेख,सलमान भाई, इमरान, मोहम्मद जाविद ,वाजिद पठान, राजा उल कुरेशी,सह आदि बांधव उपस्थित होते.