अमळनेर शहर प्रतिनिधी ,येथील अनंत चतुर्थीला शहरातील माळीवाडा – कसाली मोहल्ला या संवेदनशील भागातील जामा मशीद वर गुलाल फेकल्याने गणेश मंडळाच्या अध्यक्षा सह पदाधिकारी यांच्या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की येथे दि.17 सप्टेंबर रोजी श्री.गणेश विसर्जन मिरवणुका शहरातून निघाल्या होत्या .त्यातच शहरातील कसाली मोहल्ला येथे मुस्लिम समाजाची जामां मशीदीवर माळी वाडा येथील त्रिमुती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व मंडळ श्री.गणेशाची मुर्ती ट्रक्टरवर ठेवुन चामुंडाई डि.जे अमळनेर सह वाद्य वाजवित परिसरातील लोकासह नांचत गुलाल उधळत माळी वाडा- भोई वाडा-कसाली मोहल्ला मार्गे जामा मस्जिद जवळ आले असता हातातील गुलाल उधळत असल्याचे लक्षात येताच मशिदी जवळ उभे असलेल्या सलीमोद्दीन कमरोद्दिन व मशिद पंचानी सदरच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष यांना सांगून देखील मशिदीवर गुलाल उधळल्याचे सलीमोद्दीन कमरोदोन यांनी इकबाल खान पठाण यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता मशिदीवर गुलाल उधळल्याचे आढळून आल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या मुळे मुस्लीम समाजाचे पंच मंडळ तसेच मस्जिदचे ट्रस्टी अशांची बैठक होवून विचार विनीमय करुन सलीमउद्दीन कम्रोउद्दीन यांचेसह अमळनेर पोलीस स्टेशनला इकबाल खान पठाण यांनी त्रिमुती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य विरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात भा.न्या.संहिता २०२३ च्या कलम २९८,३(५), म.पो.अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१),३७(३),१३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
याप्रकारामुळे अमळनेर मधील सामाजिक सलोखा निर्माण होण्यास अडथळा निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते.अमळनेर ची भूमी ही संत सखाराम महाराज व मातृ हृदयी साने गुरुजींच्या नावाने जगात ओळखली जात असताना य कृतीमुळे अमळनेर शहराला खाली मान घालवी लागत असल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.समाजकंटक कोणत्याही जाती धर्माचा असो त्याच्या वर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
“तालुक्यातील दोन धर्मातील जातीय तेढ नष्ट व्हावा म्हणून सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन कायम स्वरुपी एकमेकात भाईचारा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.”