वीर गोगादेव महाराज मेहतर समाजाचे आराध्य दैवत असून त्यांचा जन्मोत्सव राजस्थानात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खानदेशातही त्यांचा जन्मोत्सव धुळे,नंदुरबार,जळगांव, चाळीसगांव, धरणगांव,अमळनेर येथे साजरा करतात.अमळनेर शहरात ही वीर गोगादेव जन्मोत्सव साजरा केला जातो.मेहतर समाजाचे वीर गोगादेव है त्यांचे आराध्य दैवत असून त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव आषाढ गुरूपौंर्णिमेपासून सुरू होतो. गुगुरूपोंर्णिमेला छडीची स्थापना केली जाते. छडी म्हणजे बांबूची मोठी काठी असते.तिला तोरणे लावून, कपड़े घालून सजविले जाते. छड़ीला परमेश्वराचे स्वरूप दिलेले असते.छड़ी सव्वा महिना बसवतात.छड़ीच्या सेवेसाठी ‘भगत’ असतो.. छड़ीची दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा केली जाते.त्याला धूप-दीप-नैवेद्य दाखवितात.छडीचा भगत रोज एक वेळेस जेवण करतो. छडीची मिरवणूक काढतात.
जे भक्त छडी आपल्या खांद्यावर अथवा पोटाला रूमाल बांधून चालतात, ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करतात त्या भक्तास घोड़ा अशी संज्ञा दिली जाते.असे एका छड़ी सोबत 25 ते 30 तरूण घोड़े म्हणून असतात. ते तरूण सव्वा महिना एक वेळेचे भोजन करून उपवास करतात आणि जन्मोत्सवाचे नियम अगदी कड़क काटेकोरपणे पाळतात.
अमळनेरात मेहतर समाजात एकूण पाच छडीची स्थापना केली जाते. शहरात छडी पुढील भक्तांकड़े असते. महर्षी स्वामी नवलनगर-गांधलीपुरामध्ये 3 छड्या बसविल्या जातात.
झामी चौक रामदेवजी बाबा जगन जेधे भगत, पप्पु कलोसे भगत, बजरंगजी अटवाल भगत, श्रीराम मंदीर गांधलीपुरा-सुनिल चिरावंडे भगत,नारायण कलोसे भगत हे असतात
तर यशस्वीतेसाठी विकास जाधव, विक्की जाधव,सुदेश भुरट, संतोष लोहरे, रवि घोगले,राजेश दाबोळे यासह आमळनेर सकल पंच यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत कार्यक्रम संपन्न होतो. गांधलीपुरा भागात 4 ठिकाणी तर झामी चौक भागात 1ठिकाणी या छड़्या मोठ्या भक्तिभावाने बसवतात.
*छड़ीची मिरवणूक :-*
छडीची पूजा- अर्चा बरोबर तिची मिरवणूक ही मोठ्या जल्लोषात निघते.गुरुपौर्णिमेला छड़ीची स्थापना झाल्यावर तिसऱ्या दिवशी गोगा देवांची छड़ी मिरवणूक नदी काठी घेऊन जातात व नदीवर छड़ीची पूजा होते. त्या धार्मिक विधीला खाजामीयाला भेटण्यास घेऊन जातात असे म्हणतात. छडीची पूजा झाल्यावर पुन्हा छडीला मंदीरात आणले जाते. त्यानंतर नागपंचमीला छड़ीची मिरवणूक संध्याकाळी निघते. नागाला दूध पाजण्यासाठी वर्णेश्वर महादेव मंदीरावर वाजत-गाजत घेऊन जातात. मंदीरात दूध चढवितात,पूजा होते,पुन्हा आपल्या स्थानावर आणले जाते. नागपंचमी नंतर नारळी पौर्णिमेला मिरवणूक निघते. या फेरीला गोरक्षनाथ फेरी असे म्हणतात. गोरक्षनाथ है गोगा देवांचे गुरू असल्याने त्यांच्या भेटीसाठी नेतात.गुरूची भेट घेऊन परत आणतात.शेवटच्या नवमीच्या दिवशी मोठ्या धामधुमीत छड़ीची मिरवणूक निघते. पाचही छड़्या गावात फिरतात, श्रृद्धाळू मोठया श्रद्धेने आपल्या इच्छेने दान देतात.रात्री विसर्जनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे वाटप होते. छड़ीच्या कार्यक्रमाचा समारोप होतो.छडीचा उत्सव हा सर्व समाजातील लोकांना एकत्र आणून गुण्या-गोविंदाने जगण्याचा संदेश या छड़ी उत्सवा मागून मिळत असतो.
लेखक
प्रा.डॉ मनीष रघुनाथ करंजे,
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा