अमळनेर, दि. १३: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी २:०० वाजता शहरातील सुजाण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे , जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील ,कार्याध्यक्ष शाळीग्राम मालकर, ओबीसी सेल चे अशोक पाटील, सामाजिक न्याय चे जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे,युवक जिल्हा चे उमेश पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत जिल्हा आणि तालुका पातळीवरील विविध विषयांवर चर्चा होणार असून येत्या काळातील रणनीती ठरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रदेश उपाध्यक्ष तथा मा आ डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष (ग्रंथालय सेल) उमेश पाटील यांचीही या बैठकीला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत जिल्हा आणि तालुका पातळीवरील पक्षाच्या हालचालींचा आढावा तसेच येत्या निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आखनी व पक्षाच्या विस्तारासाठी नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती सह पक्षाच्या विविध शाखा आणि सेलांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे म्हणून या बैठकीला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,तरी बैठकीला उपस्थित राहण्याचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील आवाहन यांनी केले आहे