अमळनेर प्रतिनिधी,जगाला वस्त्र निर्मिती करणारे व साळी समाजाचे आद्य पुरुष वेदमूर्ती श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव दि 17/08/2024 वार – शनिवार रोजी सालाबादा प्रमाणे साळी समाजा मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा व अभिषेक आणि सत्य नारायण ची महापूजा करण्याचे योजिले आहे. महिलां मंडळ आणि विद्यार्थी साठी विविध स्पर्धा आयोजन तसेंच दुपारी 3 वाजता जिव्हेश्वर मंदिर साळी वाडा झामी चौक येथून श्री भगवान जिव्हेश्वर यांची मूर्ती पालखीत विराजमान करून टाळ मृदुंग व बँड पथका सह जय घोषात भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल तरी समाज बांधव व भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान प्रताप साळी व दिलीप मुंदनाकर यांनी केले आहे.