अमळनेर: शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर सौ अपर्णाताई मुठ्ठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी परेड करून ध्वजास मानवंदना दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, नृत्य व नाटक सादर करून स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली. कार्यक्रमादरम्यान शाळेत विविध स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वाटप करून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मार्गदर्शक श्री बजरंग अग्रवाल, चेअरमन श्री डी डी पाटील, संस्थापक अध्यक्ष श्री नीरज अग्रवाल, डॉक्टर अनिल शिंदे, अध्यक्षा सौ सितीका अग्रवाल, सदस्या सौ ममता अग्रवाल, सौ आचल अग्रवाल व मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अपर्णाताई मुट्ठे व डॉक्टर अनिल शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व पालकांचे आभार मानले.