आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत दिवंगत स्व. उदय वाघांना वाहिली सामूहिक आदरांजली….

अमळनेर येथील भारतीय जनता पार्टीचे दिवंगत माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय वाघ यांच्या पाचव्या पुण्यस्मृती निमित्त अमळनेर येथिल स्मारक स्थळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.


महायुती चे कार्यकर्ते स्मारक स्थळी एकत्रित आल्यानंतर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण व प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यकर्त्यानी “उदय बापु अमर रहे” च्या घोषणा दिल्या.आमदार पाटील यांनी भावना व्यक्त करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देत बापु आजचा दिवस पाहायला तुम्ही हवे होतात,या शब्दात सुमानंजली अर्पण केली.

यावेळी भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे शहर व ग्रामिण भाग तथा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.याशिवाय इतर पक्षासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील यावेळी उपस्थिती दिली.यायाठिकाणी दिवसभर कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती,बाहेर गावाहून देखील कार्यकर्त्यानी हजेरी लावली.भावनिक झालेले काही कार्यकर्ते दिवसभर स्मारकस्थळीच थांबून होते.अनेकांनी अश्रूही अनावर झाले होते.खासदार स्मिता वाघ याकामानिमित्त दिल्ली येथे असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह वाघ कुटुंबियांच्या अनुपस्थितीत हा स्मृती दिन घडवून आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!