जळगांव प्रतिनिधी, येथील बहुजन समाज पाटीॅ ची जिल्हा जळगाव समिक्षा बैठक घेण्यात आली.हि बैठक महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा खान्देश झोन प्रभारी इंजी शांताराम तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .
सदर बैठकीत 9 ऑक्टोबर बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या पुणे करार धिक्कार परिषद कार्यक्रमाच्या संदर्भात व संघटन मजबूती विषयी तसेच काँग्रेसच्या सत्यानाश हाच आपला मुक्तीच्या मार्ग होय, हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उपस्थितांना सांगितले. ह्यावेळेस प्रस्तावना व प्रमुख मार्गदर्शकांच स्वागत जि. अध्यक्ष राहुल बनसोडे, जि.उपअध्यक्ष नारायण अडकमोल यांनी केले.
सदर बैठकीला जिल्हा प्रभारी सुरेश गणविर ,जि प्रभारी नरेंद्र खैरनार,जि प्रभारी सतीष बिऱ्हाडे , जि महासचिव राजाराम मोरे ,जि बीव्हीफ संयोजक विलास लुले,जि कोषअध्यक्ष शैलेजाताई सुरवाडे,जि सचिव संदीप मगरे ,मा जळगाव महानगर शहर अध्यक्ष शांताराम अहीरे ,जळगाव ग्रामीण अशोक सिरसाट ,वरिष्ठ कार्यकर्ता सुशील केदारे , चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन ए बाविस्कर , चाळीसगाव विधानसभाध्यक्ष गौतम अहीरे ,भुसावळ विधानसभाध्यक्ष दिनेश नरवाडे , तसेच जिल्ह्य़ातील, विधानसभेतील कार्यकर्ते उपस्थित होते.