अमळनेर येथील मंत्री अनिल भाईदास पाटील म्हणजे विकासाचे एक व्हिजन असलेलं नेतृत्व आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे जवखेडा गाव असेल किंवा आजूबाजूची गावे असतील सर्वांनीच भरभरून मतदान केल्याने त्यांनी देखील विकास कामांच्या रूपानेच त्याची परतफेड केल्याने यंदा जवखेडा पंचक्रोशीतील जनता अनिल पाटील यांनाच पसंती देईल असा विश्वास जवखेडा येथील माजी सरपंच तथा विकास सोसायटी चे चेअरमन श्यामकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात त्यांनी अधिक बोलतांना सांगितले की अनिल पाटील यांच्या सारख अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अमळनेर च्या जनतेला आमदार म्हणून लाभल हे खरोखरच आम्ही भाग्य समजतो.गेल्या पाच वर्षात जवखेडा गावात भरभरून विकास कामे देऊन अनेक प्रश्न दादांनी सोडविले आहेत.सर्वात महत्वाचा प्रश्न त्यांनी सोडविला असेल तर तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा,म्हणजे आमच्या गावात पाणी मुबलक होते पण गावठाण फिडर वरून वीज घ्यावी लागत असल्याने लोड वाढून नेहमीच पाण्यासाठी बोंबाबोंब होत होती.परंतु अनिल दादांनी नवीन डीपी मंजूर केल्याने विजेचा प्रश्न सुटून पाण्याची तक्रारच आमच्या गावाची मिटली आहे.याशिवाय संपूर्ण तालुक्यात दोन सी एस सी सेंटर,सुविधा केंद्र मंजूर केले असताना त्यातील एक जवखेडा गावात मंजूर केल्याने अनेक गावांची ऑनलाइन ची कामे गावातच होऊ लागली आहेत. तसेच नवलनगरला जोडणारा रस्ता केल्याने धुळे कडे जाणारा शॉर्टकट मार्ग झाला आहे.भिल्ल वस्तीत केलेले सुशोभीकरण ही गावाची शोभा वाढविणारे आहे.
जवखेडा सह वावडे,आरडी, आनोरे ,पिंपळे यासह इतर गावामध्ये देखील पाणीपुरवठा योजना असेल,रस्ते असतील,स्मशान भूमी असेल, संरक्षण भिंत असेल,ग्रा प इमारत असेल,शेत रस्ते असतील अशी अनेक विकासाभिमुख कामे झालेली आहेत.सतत पाच वर्षे संतर्कात राहणारा आमदार म्हणून अनिलंदादांची ओळख निर्माण झाली असून अश्या कर्तृत्ववान भूमीपुत्रास आम्ही तर पहिली पसंती देणारच आहोत परंतु इतर गावांनी देखील पहिलीच पसंती द्यावी असा आग्रह आम्ही धरणार असल्याचे श्यामकांत पाटील यांनी सांगितले.आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व दुसऱ्यांदा आमदार झाल्यास विकासाचा हा रथ कुणीही थांबवू शकणार नाही असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.