अमळनेर प्रतिनिधी , येथील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा नर्मदा फाऊंडेशन चे संचालक डॉ अनिल शिंदे यांनी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन संपर्क वाढला.
अमळनेर विधानसभा ही पांपरिक काँग्रेस चा मतदार संघ असल्याने येत्या निवडणुकीत अमळनेर ची जागा काँग्रेस पक्षाला सोडावी किंबहुना ती जागा काँग्रेसचीच आहे व ती काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याचे गृहीत धरून तालुक्यातील जवळ पास चार ते पाच इच्छुक उमेदवार तयारी करीत आहे.त्यातीलच तालुक्यातील काँग्रेस नेते डॉ अनिल शिंदे यांनी गेल्या तीन ते चार महिन्यापासून जन संपर्क वाढवला आहे.नर्मदा फाऊंडेशन च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत असल्याने त्यांचा प्रत्येक खेड्यापाड्यात दांडगा संपर्क आहे.याचा फायदा काँग्रेस पक्षाला व्हावा व उमेदवारी मिळाल्यास निवडणुकी विजयी पताका फडकाव्यात या उद्देशाने विधानसभा मतदारसंघातील जवळपास शंभर खेडे पिंजून काढले आहेत .त्यातीलच एक भाग म्हणून काल ते बाहद्दरवाडी,खोखरपाट,हेडावे या गावातील ग्रामस्थांची समस्या जाणून घेण्याकरिता दौरा करून तेथील समस्या जाणून घेतल्या.अमळनेर विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास निवडणुक लढविण्याचा त्यांचा मानस आहे.त्यांच्या उद्देशाला ग्रामस्थ प्रचंड प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे.लोकांचा प्रेम उत्साह वाढत आहे
डॉ अनिल शिंदे हे मतदार संघातील ज्येष्ठ नागरिक,माताबघीनी ,शेतकरी व तरुण मंडळींची भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्न करीत आहे.महाविकास आघाडी कडून विधानसभा लढावी अशा चर्चा सुद्धा लोकांकडून केल्या जात आहेत.