भाजपाने ईडी दाखवून नेते घेऊन गेले मात्र इमानदार जनतेला घेऊन जाऊ शकले नाही – सुप्रिया सुळे
अमळनेर प्रतिनिधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्यातील बहिणीशी साधला संवाद.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यात तीन ठिकाणी मेळाव्याच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्याने नागरिकांना आपले म्हणणे ऐकून घेतल्याने चेहऱ्यावर समाधान मिळाल्याचा भाव स्पष्ट दिसला.
अमळनेर राष्ट्रवादी तालुका पदाधिकारी यांनी शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महिला सह तरुणाशी “ताई आपल्या भेटीला” या संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत मेळाव्याची सुरुवात खासदार सुप्रिया सुळे यांनी मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यार्थिनी कु.गिताली हिने प्रथम मनोगत मांडून सर्व तरुण राष्ट्रवादी सोबत असल्याची ग्वाही दिली,या कार्यक्रमाची प्रस्तावना वरिष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी केली,यानंतर महिला जिल्हाध्यक्षा सौ चौधरी,जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,गुलाबराव देवकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
सदर संवाद मेळाव्याला संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की,अमळनेरकरानी मागील विधानसभा निवडणुकीत माननीय शरद पवार साहेब यांच्या शब्दाला किंमत देत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला त्या बद्दल धन्यवाद मानले, बीजेपी ने आमच्या घरात अंतर पाडले,अदृश्य शक्ती ने कुटुंब फोडले,पवार साहेबांची मुलगी म्हणून त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली,संकटात महिला कधी रडत नाही तर लढते,हे दाखवून दिले,मी कधीच पैसे खाल्ले नाही त्यामुळे मी बिल भरत नाही व भरू सुद्धा देत नाही,सुसंस्कृत महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी शरद पवार साहेब यांच्या पाठीशी असायला हवे, इडीचा मला भीती दाखवण्याची ताकद नाही,इतरांना इडी ची भीती दाखवून घेऊन गेले मात्र इमानदार मतदार घेऊन जाऊ शकले नाही,जनतेनी लोकसभेत जनतेची ताकद दाखवून दिली,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जनतेशी नाड जोडा,
मी लोकांची प्रतिनिधी,जळगाव जिल्हात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना पिण्याला पाणी व शेतकरी यांना शेतीसाठी भावाने पाण्याचा प्रश्न सोडवला नाही,कॉग्रेसच्या काळातच सुख सुविधा झाल्या.डिसेंबर मध्ये आघाडी सरकार येणार असल्याने आम्ही घरबसल्या पैसा आणून देऊ,लाईनीत उभे राहू देणार नाही,भावाने काही दिले नाही तरी आम्ही बहिणी त्याला सन्मान देऊ,भावाने मागितले असते तर सर्व दिले असते,ओरबाडून घेऊन जायची गरज नव्हती,हा महाराष्ट्र फक्त एकाच माणसाला समजतो तो म्हणजे शरद पवार,महिलांची सुरक्षा व प्रगती फक्त शरद पवार साहेब यांच्या मुळेच आहे.महिलांनी पूर्ण ताकदीने शरद पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मंचावर माजी पालकमंत्री सतीश पाटील,माजी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील,महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील,माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे,जळगाव महानगर अध्यक्ष अजीज मलिक,ज्येष्ठ नेत्या ऍड इंदिरा ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
छ्त्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह नागरिकांनी ओतपोत भरलेले होते.उपस्थित नागरिकांना उभे राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती.नाट्यगृहात जेव्हढी माणस होती तेव्हढी नाट्यागृहा बाहेर बघायला मिळाली
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी आमदार डॉ बी एस पाटील,तालुका अध्यक्ष सचिन पाटील,शहर अध्यक्ष श्याम पाटील,राष्ट्रवादी ग्रंथालय सेल चे उमेश पाटील,प्रा अशोक पवार, प्रशांत निकम रिटा बाविस्कर गणेश नकवाल,राष्ट्रवादी महिला सेलच्या कमलआक्का पाटील,कविता पवार,भावना देसले,आशाताई शिंदे, किसान सेल चे मनोहर पाटील,विद्यार्थी सेल चे राहुल बिऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी ए पाटील यांनी केले.