अमळनेर प्रतिनिधी येथील अमळनेर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ओबीसी चेहरा म्हणून दैनिक पुण्य प्रताप चे मुख्य संपादक विवेकानंद वसंतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अमळनेर तालुक्यात शिक्षणाची गंगा आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्व सामान्य पर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या बहुजनवादी विचारांचे कैलासवासी आबासौ. व.ता.पाटील यांचे सुपुत्र दैनिक पुण्यप्रताप चे मुख्य संपादक तथा समाज सुधारक विवेकानंद वसंतराव पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन राजकारणातील मातब्बर श्रधेय वंचितांचे आधारस्तंभ बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना अमळनेर विधानसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर केली. साने गुरुजी यांची कर्मभूमीत विवेकानंद जी पाटील यांना मिळालेले तिकीट म्हणजे राजकारणातील एक पाऊल पुढे असेच मांनावे लागेल.
श्रीविवेकानंद पाटील…….अमळनेर मध्ये बहुसंख्य असलेल्या वंचित बहुजन समाजाला गृहीत धरून राजकारण करणाऱ्यांना धुळ चाटवण्यासाठीच माजी उमेदवारी असणार.जातीय सलोखा निर्माण करून लोकशाही वाचविण्यासाठी माझा लढा असणार आहे .आता पर्यंत दैनिक पूण्यप्रताप च्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या समस्यांना न्याय देण्यासाठी तत्पर होतो.आता प्रत्यक्ष विधिमंडळात जाऊन त्यानां न्याय हक्कासाठी झटणार.या करीता माझी उमेदवारी असून उद्या दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी महापुरुषांचे दर्शन घेऊन श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज भरणार असून याप्रसंगी मला आशिर्वाद देण्यासाठी बहुजन समाजाने उपस्थिती द्यावी.