संपादकीय विशेष…
महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राज्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली.अनेकांनी विजयाची आखणी करून प्रचार प्रसार सुरू केला.अनेक ठिकाणी युती व आघाडीची काटे की टक्कर होणार असल्याने त्या जागे कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उदा.बारामती मधील अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार,एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे.या सह खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभे कडे ही सर्वांचे लक्ष लागून आहे.
मध्यंतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवारांनी बंडखोरी करून अनेक आमदार आपल्या सोबत घेऊन महायुती सोबत साठगाठ बांधली.त्यांच्या सोबत अमळनेर चे आमदार अनिल पाटील हे सुध्दा गेले होते.त्याच पार्श्वभूमीवर मा शरद पवारांनी अनिल पाटील यांच्या बाबतीत एक सूचक विधान केले की,”अनिल पाटील हे पुढील काळात विधानसभेत दिसणार याची काळजी घेऊ.” या विधानामुळे अमळनेर मध्ये आघाडीतील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी बाऊगर्दी केली.तब्बल डझन भर इच्छुकांनी आप आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना साकडे घातल्याने वरिष्ठांनी ही कामाला लागा म्हणून आदेश दिले.यामुळे आघाडीतील इच्छुक नेत्यांनी व्यक्तिक पातळीवर प्रचार प्रसार करायला सुरुवात ही केली.मात्र आघाडीतील जागेवरून रस्सीखेच होत असल्याने उमेदवारी जाहीर करायला विलंब लागत आहे.त्यातच अमळनेर ची जागा कोणत्या पक्षाला सुटणार , हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांनी मुंबई फेऱ्या मारल्या.वरिष्ठांच्या मर्जित राहावे म्हणून अनेक क्लृप्त्या आखल्या.मात्र अद्याप ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना अमळनेरच्या जागेचा तिढा सोडविण्यात आला नाही.
उमेदवारी अर्ज भरण्यास बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिल्याने अद्याप उमेदवारी जाहीर नझाल्याने आघाडीतील इच्छुकांचा हिरमोड होतांना दिसत आहे.युतीचे उमेदवार अनिल पाटील व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी अमळनेर विधानसभा पुर्ता पिंजून काढला आहे.बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे नियोजन सुध्दा झाले आहे.अनेकांचे सामाजिक कार्यकर्तेच्या बैठकी सह मेळावे घेऊन आपला प्रचार उच्च कोटीला घेऊन गेले आहे.त्यामानाने उमेदवारी जाहीर नझाल्याने आघाडीतील इच्छुकांनी आपला प्रचार प्रसार थांबवला असल्याचे दिसून येत आहे.युतीचे उमेदवार अनिल पाटील व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रचार प्रसार व यंत्रणा राबविण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे अवघड होऊन बसल्याचे आघाडीतील एका इच्छुक उमेदवारीने नाव नसंगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
युती चे अनिल पाटील व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आघाडीचा अजूनही उमेदवारी जाहीर न झाल्याने इच्छुकांना धडकी भरली आहे.मतदानाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी मोठे संकट उभे ठाकले असल्याने उमेदवारी घेऊन ही पराजयाला सामोरे जावे लागण्याची भीती आता आघाडीत निर्माण झाली आहे.उमेदवारी घेतल्यास आत्मघात तर ठरणार नाही ना ? अशी भावना आता इच्छुक उमेदवारांमध्ये दिसून येत आहे.
या गंभीर परिस्थितीचे आकलन करून वरिष्ठांनी त्वरित निर्णय घेणे अपेक्षित असल्याची चर्चा आघाडीच्या कार्यकर्त्या सह नागरिकांमध्ये होतांना दिसत आहे.