के एन बी कला महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा – विद्यार्थ्यांनी ग्रंथपालांच्या कामाचे महत्व घेतले समजून

धुळे प्रतिनिधी, येथील के एन बी कला महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,ग्रंथालय आणि ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची गरज संपूर्ण जगाला करून देणारे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १२ ऑगस्ट या जन्म दिनी हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयशास्त्राद्वारे ग्रंथालयाचे पावित्र्य आणि महत्त्व वाढविणारे ‘फाइव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’हे पुस्तक म्हणजे ग्रंथालयशास्त्राचा पाया समजला जातो. ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनविण्याकरिता लिहिलेल्या या पुस्तकाचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी त्यांनी तयार केलेली पंचसूत्री म्हणजेच ग्रंथालयशास्त्राचा पाया होय. त्या अर्थाने पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन भारतीय ग्रंथालयशास्त्राचे आधारस्तंभ होते.

या दिनी महाविद्यालयात डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमांना पुष्पहार उपप्राचार्य डॉ यु वाय गांगुर्डे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा डॉ सुजाता निकम यांनी या दिनाचे महत्त्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,आपल्या देशाच्या आणि देशवासीयांच्या विकासात ग्रंथालयाचे मोलाचे योगदान आहे. आधुनिक भारताच्या ग्रंथालयीन जीवनाला बहुमान्यता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन होय.ग्रंथालयातील प्रत्येक ग्रंथ जसा महत्वाचा आहे त्याच पद्धतीने ग्रंथालयात येणारा वाचक सुद्धा महत्वाचा आहे.सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रंथपालांनी वाचकांना हवी ती माहिती कमी कालावधित देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
या दिनी महाविद्यालयात ग्रंथाची ओळख वाचकांना व्हावी म्हणून ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले होते.विद्यार्थी यांनी ग्रंथालयाच्या कामकाज विषयी माहिती जाणून घेतली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ सुजाता निकम, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ उमेश गांगुर्डे ,सहाय्यक महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. छाया पाटिल,डॉ एन झेड पाटील,डॉ के डी बागुल,डॉ एस जे पाटील, प्रा.व्ही बी शिंदे, डॉ एस के कदम, प्रा. एस. डी.सुर्यवंशी, प्रा.पी आर पाटील, प्रा. पराग बोरसे यासह शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, रवींद्र धनगर, पुनम चौधरी, संतोष पाटील संजय पवार, रोहिदास पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!