माजी आमदार साहेबराव पाटील तुतारी चिन्हावरच लढणार – शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांचा ठाम विश्वास

अमळनेर ,येथील अजित पवार यांच्या संवाद यात्रेने स्थानिक राजकारण चांगलेच ढवळून निघालेले बघायला मिळाले.

शेतकरी सन्मान संवाद व युवा संवाद कार्यक्रमाला जाण्या अगोदर सदर जन संवाद यात्रा माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या शहरातील राजभवना वर धडकली.अजित पवार हे साहेबराव पाटील यांच्या भेटीला गेले असता त्यांचे स्वागताला साहेबराव पाटील उपस्थित नव्हते तर त्यांचे नातू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मात्र या प्रकाराने अजित दादा सह मंत्री अनिल पाटील यांच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा उमटलेले दिसले.

या प्रकाराने राजकीय गोटात चर्चेला उधाण आले.साहेबराव पाटील यांनी अजित पवार यांच्या स्वागताला हजर नराहुन अनिल पाटील यांना चितपट केल्याची चर्चा रंगली आहे. करारा जवाब दिल्याचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते बोलत आहे.

याबाबत विचारणा करण्यासाठी साहेबराव पाटील यांना प्रसार माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते त्या काळात नॉट रीचेबल होते.ते राजवड या त्यांच्या गावी असल्याचे त्यांचे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी सांगितले. मात्र सायंकाळी संपर्क साधले असता त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण पुढे केले.

गेल्या काही दिवसापासून अमळनेर मधील राजकारण साहेबराव पाटील यांच्या राजकीय भूमिकांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे.कधी अपक्ष तर कधी तुतारी हातात घेऊन लढणार असल्याचे संकेत त्यांच्या कडून मिळत आहे.सर्व नागरिकांचे लक्ष त्यांच्या राजकीय भुमिके कडे लागून आहे.आज ही त्यांची अमळनेरचां विकास पुरुष म्हणूनची छबी जनमानसात रुजलेली बघायला मिळते.यामुळे अमळनेर विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.

साहेबराव पाटील व अनिल पाटील यांच्या भेटी नंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.त्यात अनिल पाटील यांनी डाव सदल्याची चर्चा जोमात होती.या भेटीने मात्र साहेबराव पाटील यांच्या वर विश्वास ठेवणाऱ्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले होते.मात्र यानंतर ही अमळनेर विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी म्हणून प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे.तसे संकेत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी सोशियल मीडियावर पोस्ट टाकून दिले आहे.यामुळे साहेबराव पाटील हे नेमकी कोणती भूमिका घेतात या कडे नजरा लागून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!