🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️
*जातीचं काय घेऊन बसलात राव*
*अरे जात म्हणजे काय ?*
*माहित तरी आहे का..?*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*अरे कपडे शिवणारा शिंपी !*
*तेल काढणारा तेली, !*
*केस कापणारा न्हावी.!*
*लाकुड़ तोडणारा सुतार.!*
*दूध टाकणारा गवळी.!*
*गावोगावी भटकणारा बंजारा.!*
*भांडी बनविणारा कासार ..!*
*दागिने बनविणारा सोनार..!*
*मूर्ती मातीची भांडी बनविणारा कुंभार..!*
*रानात मेंढी-बकरी वळणारा धनगर ..!*
*पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.!*
*बूट चप्पल शिवनारा चांभार..!*
*बागायती शेती करणारा वृक्ष लावणारा माळी..!*
*आणि लढाई लढणारा क्षत्रिय.!*
*आलं का काही डोक्यात 😴..?*
*आरं काम म्हणजे जात आणि सर्वात महत्त्वाचे वरील प्रमाणे कामे आता कुठल्याही जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.*
🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
*आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत *
*आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला.*
*आता इंजीनीयर ही नवी जात.*
*कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात*
*”सी. ए” ही पण जात, तर “एम. बी. ए” ही नवी जात.*
*डॉक्टर ही पण जात*
*तर वकीलही जातच*
*तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म .*_
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
*बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात!*
*घरीच दाढी करता नवं ?*
*तेव्हा तुम्ही न्हावी होता.*
*बुटाला पालीश करता नव्हं?*
*तेव्हा तुम्ही चांभार होता.*
*गैलरी टेरेस वर झाडे लावता ना !बगीचा करता तेव्हा तुम्ही माळी होता.*
*घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?..,,तेव्हा ब्राम्हण पण होताच की ?*
*आरं कामानं मोठं व्हा,जातीनं न्हाय!*🫵🏻🫵🏻🫵🏻
*आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला,*
*हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?*
*मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव ?*
*तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही?*
*सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय!*
*सगळ्याला शिक्षण खुले हाय!*
*खूप शिकायचं कामं करायचे! माता पित्याचे- -गावाचे- जिल्हय़ाचे- राज्याचे- देशाचे नाव लौकिक करायचे.*
*”जात फक्त राजकारणी व काही स्वार्थी धर्म मार्तंड लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे “….*
🤝🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝
मा.प्रा डॉ विजय तुळसाबाई शालिग्राम गाढे
मुख्य संपादक, करडी नजर न्युज