बाबासाहेबांनी सुचवलेले अर्थशास्त्र आधुनिक भारतास आजही मार्गदर्शक

विशेष लेख…

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांच्या आदर्श विचारवंतांपैकी एक होते. त्यांच्या आर्थिक विचारांमध्ये सामाजिक न्याय, समानता, आणि आर्थिक विकासाचा समावेश होता. त्यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेतील असमानता दूर करण्यासाठी विविध योजना आणि उपाय सुचवले. त्यांच्या आर्थिक विचारांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

1. संपत्तीचे पुनर्वाटप (Redistribution of Wealth):

आंबेडकरांनी संपत्ती आणि संसाधनांचा न्याय्य पुनर्वाटप होण्यावर भर दिला. त्यांनी दलित आणि मागासवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी शैक्षणिक, औद्योगिक, आणि जमीन सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले.

2. जमीन सुधारणा:

आंबेडकरांनी जमीनदार प्रथेला विरोध केला आणि जमीन सुधारणा धोरणाची मागणी केली. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर मालकी हक्क असावा, असे ते मानत.

3. औद्योगिकीकरणाचा आग्रह:

त्यांनी कृषी क्षेत्रावर अवलंबून राहण्याऐवजी औद्योगिकीकरणावर भर दिला. त्यांच्या मते, औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सामाजिक सुधारणा घडतील.

4. राज्य नियंत्रित अर्थव्यवस्था:

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादी दृष्टिकोनातून राज्याने अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवावे, असे सुचवले. त्यांचा विश्वास होता की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाच्या आहेत.

5. कामगारांचे हक्क:

कामगारांचे शोषण रोखण्यासाठी त्यांनी आठ तासांच्या कामाच्या वेळेची शिफारस केली. याशिवाय, कामगारांना न्याय्य वेतन, सामाजिक सुरक्षा, आणि कामाच्या चांगल्या अटी मिळाव्यात, यासाठी ते आग्रही होते.

6. पाणी व्यवस्थापन:

पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन हे आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी धरणे आणि कालव्यांची योजना सुचवली. दामोदर व्हॅली प्रकल्प आणि हीराकुंड धरण प्रकल्प यांसारख्या योजनांमध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला.

7. समान आर्थिक संधी:

त्यांनी मागासवर्गीय आणि गरीब घटकांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला. आर्थिक विषमतेमुळे सामाजिक विषमता वाढते, याची जाणीव असल्याने त्यांनी आरक्षण धोरणाचे समर्थन केले.

8. रुपयाचे स्थिरीकरण:

1923 मध्ये त्यांच्या “The Problem of the Rupee” या पुस्तकात त्यांनी रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी सुवर्ण मानक (Gold Standard) पद्धती रद्द करण्याचे मत मांडले.

9. आर्थिक योजना:

त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील नियोजनावर भर दिला आणि त्यासाठी “National Economic Development Council” स्थापन करण्याचे सुचवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार केवळ आर्थिक विकासाला चालना देणारेच नव्हे, तर सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांवर आधारित होते. त्यांच्या विचारांनी भारताच्या आर्थिक धोरणांवर मोठा प्रभाव टाकला आहे.

10.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेल्या अनेक संकल्पना कडे दुर्लक्ष केले गेले. त्याकडे आजही लक्ष खुप महत्वाचे आहे. त्यांचे विचार वाचताना लक्षात येतो त्यांचा द्रष्टेपणा ‘रुपयाचे विश्लेषण’या कठिण विषयावर त्यांचा प्रबंध वाचला कि, त्यांची अर्थशास्त्रीय प्रतिभा लक्षात येते समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, इतिहास, नागरिकशास्त्र, कायदेशास्त्र इ. जीवनोपयोगी विषयाचे विस्तृत ज्ञान असलेल्या बाबासाहेबांना अर्थशास्त्रीयविचार सामाजिक व राजकीय अंगानी मांडता आले. डॉ. अमर्त्य सेन यांनी गरीबांसाठीचे अर्थशास्त्र मांडले. बाबासाहेबांनी हेच गरीबांसाठीचे अर्थशास्त्र तिन्ही अंगानी आपल्यासमोर ठेवले. राजकीय, अर्थशास्त्र, सामाजिक अर्थशास्त्र व धार्मिक (आध्यात्मीक) अर्थशास्त्र असे तीन पैलू बाबासाहेबांनी चर्चिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक कांतीसुत्र बहुआयामी आणि विविध लक्षणीय स्वरुपाचे आहे. डॉ. बाबासाहेबाचे ग्रंथ, कार्य आणि कर्त्यव्याच्या आर्थिक सुत्रातुन विचार केला तर डॉ. आंबेडकर हे विश्वाला प्रकाश देणारा आर्थिक कान्ती सुत्राचा कधिही न मावळणारा सूर्य हे प्रकर्षाने जानवते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे गाढे व्यासंगी होते कोलंबिया विद्यापिठात एम. ए. साठी “प्राचीन भारतीय व्यापार व पी.एच. डी. साठी ही “ब्रिटिश हंदुस्थानातील प्रतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती” असे त्यांचे विषय होते. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स मध्ये डी. एस्सी. साठी त्यांनी ‘रुपयाचे प्रश्न’ हा प्रबंध लिहला. हिल्टन यंग कामिशन पुढे त्यांनी दिलेली साक्ष चलनाच्या प्रश्नाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती.’

भुमीहीन मजुर, लहान जमिनी, खोतपध्दती, महार वतन, सामुदायीक शेती, जमीन महसुल आणि जमीनदाराचे उच्चाटन या विषयावर त्यांनी निरनिराळया वेळी विचार प्रकट केले. भारतीय घटनेवरील भाषणात प्रसंगानुरुप त्यांनी केलेले विवेचन यातुन त्याच्या अर्थशास्त्रीय विचाराचा मागोवा घेता येतो.

भारताच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न हे स्वप्नच ठरत आहे. तर शोषणाची व्यवस्था कायम असून देशात गरीबी, बेकारी व विषमता उग्ररुप धारण करित आहे. अशा स्थिति देशाचा, अर्थव्यवस्थेचा कणा मजबुत करण्यासाठी आणि देशाला स्वयंभू व विकसीत करुन देशात आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी आजही देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराची नितांत गरज आहे.

11.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध
प्रबंधात्मक ग्रंथातुन आपले आर्थिक विचार स्पष्ट केले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापिठाला एम. ए. च्या पदवीकरिता 15 मे 1915 ला “ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन व अर्थव्यवस्था” या विषयावर प्रबंध सादर केला. यात त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त व्यवस्था कशी होती. त्यांची वैशिष्टे, महसुलाची पध्दत व प्रमाण, मिळणाऱ्या महसुलाचा खर्च इत्यादी बद्दल सविस्तर माहीती दिली आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील महसुल धोरणाची चर्चा त्यांनी केली आहे. भारतातुन वसुल केलेल्या महसुलातुन मात्र कमी खर्च सर्वसाधारण लोकांच्या कल्याणासाठी केला जातो. त्यामुळे भारतीय लोक विकासापासुन वंचीत राहतात, ब्रिटीश सरकारच्या भारतातील कामगिरीचे विवेचन करतांना डॉ. बाबासाहेब म्हणतात, “भारताने इंग्लंडसाठी केलेले आर्थिक योगदान हे जेवढे थक्क करणारे आहे. तेवढे इंग्लंडने भारतीयासाठी केलेले योगदान विस्मयकारक आहे.”

1924 मध्ये डॉ. बाबासाहेबांनी पीएच. डी. पदवी प्राप्त करण्यासाठी कोलंबिया विद्यापिठाला सादर केलेल्या “The Evolution of provincial Finance in british india”या ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यावेळेची घटकराज्ये व ब्रिटिश केंद्र सरकार यांच्यातील आर्थिक व्यवहाराची मीमांसा केली आहे.

डॉ. बाबासाहेबांनी “The problem of Rupee” हा प्रबंध ग्रंथ (D.Sc) साठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला सादर केल्यानंतर 1923ला प्रकाशित करण्यात आला. सदर प्रबंधात्मक ग्रंथामध्ये डॉ. बाबासाहेबांनी सन 1800 ते 1893 या कालखंडातील भारतीय चलनाची जडण-घडण कशी होत गेली यांची मिमांसा डॉ. बाबासाहेबांनी केली. सन 1873 नंतर सोने आणि चांदी विनिमयाचा दर स्थिर ठेवणे कठीण झाल्यामुळे देशाचे कसे नुकसान झाले. याविषयी सविस्तर विश्लेषण डॉ. बाबासाहेबांनी यामध्ये केले आहे. आजच्या आर्थिक परीस्थीतीचे अवलोकन केले असता झालेली भाववाढ इत्यादी बाबींवर डॉ. बाबासाहेबांच्या आर्थिक दृष्टीकोनातुन विचार होणे आवश्यक आहे.

12.

डॉ. बाबासाहेबांचे आर्थिक स्वातंत्र्यता व आर्थिक विकास :

जातीव्यवस्थेच्या अंर्तगत प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुवांशिक किंवा जातीगत व्यवसाय करण्यात कटीबंध राहतात. जरी त्यांना त्या व्यवसायामध्ये आवड किंवा आकांशा अनुरुप जरी नसले. यामुळे व्यक्तीमध्ये आर्थिक क्षेत्रात उदासिनता व अकार्यक्षमता निर्माण होते. त्यामुळे त्यांची कार्यकुशलता कमी होते. भिन्न-भिन्न व्यवसायावर भिन्न-भिन्न जातीच्या एकाधिकार असल्याने आर्थिक क्षेत्रात स्पर्धेमध्ये अभाव दिसून येतो. तसेच आर्थिक क्षेत्रामध्ये अनुसंधान, उद्यम, प्रशिक्षण या गोष्टीचा सुध्दा विकास होत नाही.

अशाप्रकारे जातीव्यवस्था ही परंपरागत अर्थव्यवस्थाआधुनिक अर्थव्यवस्थेत परिर्वतीत होण्याच्या प्रक्रियेमध्ये आड येते. आज भारतीय अर्थव्यवस्था विकसीत बनण्यामध्ये जो उचांक गाठत आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी आर्थिक स्वातंत्र्या संदर्भात आपले विचार मांडून नवी दिशा दिली आहे.

13.

जर समतामुलक समाज रचना तयार करायची असेल तर डॉ. बाबासाहेबांनी मांडलेल्याआर्थिक स्वातंत्र्यातुन होवू शकते हे स्पष्ट होते.

डॉ. बाबासाहेबांचे शेती विषयक सुधारणा :

डॉ. बाबासाहेब यांचे शेती विषयक विचार व कार्य हे भारताला नवी दिशा देऊन आर्थिक बाबतीत्त सक्षम बनवणारे आहे. ‘स्मॉल होलिंडग्ज इन इंडिया अॅण्ड देअर रेमीडीज’ हा लेख सर्वप्रथम Journal of the Indian economic society, Vol. 1″यामध्ये 1918 मध्ये प्रसिध्द झाला. यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी शेती विषयक मुलभुत प्रश्न मांडले आहेत. बाहेर देशातील धारण क्षेत्रातील उदा. देतांना ते म्हणतात इंग्लंडमध्ये मोठे धारण क्षेत्र आहे. फान्स मध्ये लहान धारण क्षेत्र आहेत. तसेच हॉलंड आणि डेन्मार्कमध्ये आहेत. मुंबई प्रदेशाचे उदा. देतांना ते म्हणतात, येथील धारण क्षेत्र 0.25 एकरापासून तर पूण्याजवळील पिंपळा सौदागर येथील 1 ते 2 एकरापर्यंत आहे. हि धारण क्षेत्रे भारतीय शेतीकरिता फारच गंभीर बाबा आहे असे म्हटल्या जाते. लहान धारण क्षेत्राबाबत डॉ. बाबासाहेब म्हणतात. “The evils of small holdings are many. The evil of fragmentation are very great and must be met by a comprehensive scheme of consolidation” जमीनीच्या आकारामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो. यावर उपाय सुध्दा डॉ. बाबासाहेबांनी सुचविला आहे. तो म्हणजे ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ होय.’ सामुदायीक शेती संदर्भात त्यांनी आपले विचार मांडून आदर्श शेती व्यवसायामुळे शेतकरी हा आपले राहणीमान बदलू शकेल हे ते जाणत होते. तसेच डॉ. बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी बॉम्बे विधिमंडळात ‘खोती जमीनदारी पध्दती रद्द करणारे पहिले विधेयक सादर केले. त्यांच्या विचार आणि कार्यामुळे “महार वतन व खोती पध्दत” रद्द करण्या संदर्भात सरकार दरबारी विचार मांडुन रद्द करण्यास भाग पाडले.

डॉ. बाबासाहेबांचे कामगारांचे आर्थिक प्रश्ना बाबत कार्य :

भारतातील कामगार वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. बाबासाहेब हे सातत्याने संघर्ष करीत राहीलेत म्हणुनच कामगाराची स्वतंत्र्य संघटना असावी असे त्यांना वाटत होते. कारण कामगारामध्ये आपआपसातील वाद भयंकर होते. त्यात जातीवादाने शिरकाव केल्यामुळे अस्पृश कामगाराची स्थिती दयनिय होती. सावकाराच्या तडाख्यात दलित समाज सापडला असल्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट होती. त्या विरुध्द कामगार पुढाऱ्यांनी आवाज उठवला नव्हता. अस्पृश्य कामगाराचे दोन प्रमुख शत्रू होते भांडवलाशाही व ब्राम्हणशाही म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “कापड विणण्याचे काम स्पृश्यांनी केले काय? किंवाअस्पृश्यांनी केले काय? मालकाला त्यात सुख-दुःख नाही. त्यांचा माल निघाला त्याचा फायदा झाला म्हणजे झाले.” “गिरणी कारखान्यात कामगारामध्ये जातीभेद असला तरी कारखानदारांचा उद्देश नफा कमावण्याचा आहे. मग तो माल कोणीहि तयार करत असो.
कामगारांमध्ये अंतर्गत भेदभावपुर्ण व्यवहार धोकादायक आहे. म्हणुनच अस्पृश्य कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळून देण्यासाठी आपले विचार मांडून कार्य केले.

14.

डॉ. बाबासाहेबांचे चलनव्यवस्थे विषयी विचार :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “रुपयाचा प्रश्न त्याचे मुळ आणि समाधान” पदवीसाठी लिहलेल्या प्रबंधात चलनाविषयी माहिती मिळते. हा ग्रंथ 1923 मध्ये प्रकाशित करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांनी चलनपध्दतीचा, ग्रामीण अर्थव्यवस्था वस्तुची अदलाबदल करुन व्यवहार चालवण्यापासून ते सोने-चांदी या धातुंचे चलन आणि आजचे कागदी चलन खात्यापर्यंत सांगोपांग व जिज्ञासू प्रवृत्तीने अभ्यास करुन त्यांचा शोध घेवून ग्रंथात अचूक व विस्तृत माहिती दिली. डॉ. बाबासाहेब सांगतात की, ब्रिटीश राजवटी पुर्वी मोगल साम्राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा पाया अकबराने घातला. त्या काळापासून भारतात प्रामुख्याने चलन म्हणुन सोने-चांदी किंवा इतर धातुंचा वापर होत असे. तसेच ब्रिटीश पुर्वी राजवटीत नोकरांना आणि सैनिकांना वस्तु स्वरुपाने पगार मिळत असे. ब्रिटीशांनी त्या ऐवजी रोख पैसे देण्यात सुरुवात केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तर्कनिष्ठ आणि दृढ मत होते, की जोपर्यंत रुपयाच्या सामान्य कयशक्ती मध्ये स्थिरता येत नाही. तोपर्यंत हे चलन स्थिर होण शक्य नाही आणि प्रामुख्याने ही बाब विनिमय प्रमाणामुळे शक्य होत नव्हती. या व्यवस्थेमुळे रोगाचा मुळ कारणाचा शोध घेण्याऐवजी फक्त लक्षणे विचारांत घेवून उपाय केला जात होता. डॉ. बाबासाहेबांनी हे सुचवलेले विचार सत्य आणि मुलगामी होते. ‘

डॉ. बाबासाहेबांचे औद्योगिकरण्या संबंधी विचार :

औद्योगिकीकरणा संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “औद्योगिक निती अशाप्रकारे असली पाहीजे की, ज्याच्या परिणाम स्वरुप अधिकतम उत्पादनाची निपुणता आणि उत्पादना बरोबरच आंतरराष्ट्रीय औद्योगिक बाजारामध्ये देशी उद्योग व त्याच्या उत्पादनाची प्रतिस्पर्धा क्षमता प्रतियोगीता पुर्ण आणि लाभकारी असली पाहिजे.”

उद्योग क्षेत्रात अशी परिस्थिती कायम राहील्याने देशाचा औद्योगिक आणि आर्थिक विकासामध्ये गुणात्मक संवर्धन होणे संभव आहे. ते पुढे म्हणतात, “कोणतेही राष्ट्र भांडवलशाही असो वा समाजवादी त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती व विकासासाठी हा सिध्दांत वापरावा लागेल.”

• डॉ. बाबासाहेबांना कांतीकारी औद्योगीक विचाराला अनुसरुन भारताची इंडस्ट्रियल रिजोल्यून पॉलिसी-1956 तयार करुन हे मानवी कल्याणावर त्याचा कोणता परिणाम होतो. या दृष्टीकोनातुन त्यांनी आर्थिक हालचालीचा अभ्यास केला होता. हा अभ्यास संपत्ती किंवा आर्थिक संबंध यांच्या बदलाचा नव्हता, तर माणूस व त्यांची निवड यांच्याशी होता. विशेष म्हणजे सामान्यात न्याय नितीने संपत्तीचे विभागणी करणे हा हेतु त्यांचा विचारा मागे होता.

आज मात्र अत्यंत भयंकर स्थिती निर्माण होऊ पाहत आहे.एकाच उद्योगपतिकडे असलेली अमाप संपत्ती आणि त्याचे असलेले सत्ताधाऱ्याशी हितसंबंध हे भारतीय अर्थव्यवस्थेला गुलामीत घेऊन जाणारी ठरू शकते. विशिष्ट वर्ग श्रीमंत होईलही मात्र उर्वरित बहुसंख्य जनतेचं काय?
वामन दादांच्या भाषेत सांगायचे झाल्यास
*सांगा धनाचा साठा अन आमचा वाटा कुठाय हो*
हि विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

*लेखक हे सामाजिक व राजकीय विश्लेषक आहेत.*
गौतम मोरे
अमळनेर
———————————-
वरील लेख विविध मान्यवरांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या लेखातून,पुस्तकाच्या विविध उताऱ्यातून साकारलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!