अमळनेर येथील मारवड येथी ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत दि. ०३ डिसेंबर २०२४ हा खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन “लेवा गणबोली दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. तर प्रास्ताविकात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी लेवा गणबोली दिनाचे महत्त्व सांगून लेवा पाटीदार समाज व लेवा गणबोली भाषा व साहित्याची ओळख करून दिली.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी पुजन करून अध्यक्षीय भाषणामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विषयी माहिती देत, त्यांनी त्यांच्या समकालीन समाज जिवनातील संघर्ष व जीवनातील तत्वज्ञान, रहस्य हे आपल्या कविता संग्रहातून खूप सोप्या आणि चांगल्या पद्धतीने समाजासमोर आणि जगासमोर कश्याप्रकारे मांडले याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक महिला विकास अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, सर्व प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.