अमळनेर प्रतिनिधी,येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात दिनांक ०९/०९/२०२४ ते १३/०९/२०२४ दरम्यान पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण जैन हे होते. व्यासपीठावर कार्यशाळा घेण्यासाठी बंगळुरू येथून आलेले प्रमुख अतिथी श्री.बसवराज मेती, खा. शि.मंडळाचे सहसचिव तथा अधिसभा सदस्य डॉ.धीरज वैष्णव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षाचे समन्वयक डॉ.मुकेश भोळे आणि विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी हे उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.शशिकांत जोशी यांनी केले तर प्रमुख पाहुणे यांचा परिचय प्रा.वैशाली महाजन यांनी करून दिला.
या पाच दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी Makeinturn & Learn to Upgrade,New Delhi,India या कंपनीचे सल्लागार श्री.मेति आले आहेत. नियमित शिक्षणासोबत कौशल्याआधरीत शिक्षण आजच्या काळाची गरज आहे, रोजगार मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल असे मत श्री. मेती यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यशाळेमुळे जैतंत्रज्ञानावर आधारीत संकल्पना अधिक स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडत आहे.त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या फळांपासून अल्कोहोल युक्त पेय तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी करत आहेत.प्रस्तुत कार्यशाळेतून विद्यार्थी औद्योगिक स्तरावर अल्कोहोल उत्पादन कसे करावे, याचे ज्ञान आत्मसात करतील महत्वाचे म्हणजे या प्रशिक्षणानंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील विभागीय स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आयआयटी हैद्राबाद येथे मिळणार आहे.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ममता महाजन आणि कु.दिव्या जाधव या विद्यार्थिनींनी केले,तर आभार प्रदर्शन प्रा.आदित्य संकलेचा यांनी केले.
प्रस्तुत कार्यक्रमास सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.हेमलता सूर्यवंशी,प्रा.स्नेहल सूर्यवंशी,प्रा.नूतन बडगुजर,प्रा.दिशा पाटील,प्रा.नेहा महाजन,प्रा.तेजस्विनी पाटील,प्रा.केतकी सोनवणे,प्रा.भावना महाजन, प्रा.कल्याणी पाटील, प्रा.नेहा पाटील तसेच प्रयोगशाळा परिचर श्री.विलास पाटील व श्री.किशोर पाटील या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.