अमळनेर प्रतिनिधी, येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव व अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकिय शालेय कॕरम तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जय योगेश्वर विदयालयात संपन्न झाल्या.या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील एकुण २०० मुले व मुलिंनी सहभाग घेतला, अत्यंत अटि तुटीच्या या स्पर्धेत नामवंत खा,शि,मंडळ संचलीत जी एस हायस्कुल शाळेने १४ वर्षाच्या मुलांच्या गटात मंयक संजय पवार व हितेश किरण पारधी,१७ वर्षाच्या गटात उदय अनिल पवार यांनी उत्कृष्ट कौशल्यदार खेळ करुन विजेते पद मिळविले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केलेअसुन पुढिल स्पर्धा दि.१२ ते१४ सप्टेंबर २०२४ दरम्यान छ.शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.
वरिल खेळाडूनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचा सत्कांर शालेय समिती चेअरमन आण्णासाहेब श्री. हरी भिका वाणी यांनी केला.
वरिल खेळाडूंना नामवंत खा,शि.मं.चे कार्याध्यक्ष डाॕ संदेशजी गुजराथी , कार्यापाध्यक्ष भाऊसो श्री. निरजजी अग्रवाल , संस्थेचे संमन्वय समिती चेअरमन श्री.डाॕ, अनिलजी शिदे ,शालेय समिती चेअरमन आण्णासो.हरि भिका वाणी ,खा.शि.मं.चे संचालक दादासाहेब श्री.योगेशजी मुंदडे संचालक भांऊसोश्री. प्रदीपजी अग्रवाल ,संचालक श्री.विनोद भैय्या पाटील ,संचालक श्री.कल्याणबापु पाटील , शिक्षक प्रतीनीधी श्री. विनोद कदम सर , मुख्याध्यापक आबासाहेब बी एस पाटील सर , उपमुख्याध्यापक नानासाहेब ए डि भदाणे सर , पर्यवेक्षक श्री.एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक सी एस सोनजे श्री,शाम पवार ,श्री.पंकज जैन सर व सर्व पदाधिकारीनी अभिनंदन करुन जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .वरिल खेळाडूना क्रीडाविभाग प्रमुख व शिक्षक प्रतिनीधी एस पी वाघ सर , व जे व्ही बाविस्कर सरांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले.