अमळनेर प्रतिनिधी, येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय खो खो या क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रताप महाविद्यालयात ०७.१०.२०२४ रोजी करण्यात आले होते. यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालय खो खो पुरुष संघाने विजेतेपद तर प्रताप महिला संघाने उप विजेतेपद मिळविले, ११ पुरुष व महिला संघ यात सहभागी झालेत. आदरणीय प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, या प्रसंगी उपप्रचार्य डॉ. विजय मांटे, जिमखाना समन्वयक डॉ.एस बी नेरकर,डॉ.कैलास निळे,डॉ. एस डी बागुल, डॉ.सुनील राजपूत,निवड समिती प्रमुख डॉ.देवदत्त पाटील, डॉ.विजय पाटील, डॉ.क्रांती वाघ, प्रा.दिपक पाटील,प्रा.जयंत शिसोदिया, प्रा.शिरसाठ, आयोजक क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,क्रीडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल,प्रा.अर्चना पाटील, प्रशांत देवकाते, मुख्य पंच श्री.सुनील वाघ सर उपस्थित होते.
प्रतापच्या खेळाडूंच्या यशाबद्दल खा.शि.मंडळ अध्यक्ष व सर्व संचालक,प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, सहसचिव डॉ.धीरज वैष्णव,उपप्राचार्य प्रा.पराग पाटील,प्रा.डॉ.विजय तुंटे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. मुकेश भोळे,स्पर्धा आयोजक व क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रा.अमृत अग्रवाल,कुलसचिव राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील,प्रशांत(बाळू भाऊ) देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विदयार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.